देवगड तालुक्यात आचारसंहिता लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड तालुक्यात आचारसंहिता लागू
देवगड तालुक्यात आचारसंहिता लागू

देवगड तालुक्यात आचारसंहिता लागू

sakal_logo
By

देवगड तालुक्यात आचारसंहिता लागू
देवगडः ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागली आहे. १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. २८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत अर्ज भरणे, ५ डिसेंबरला अर्ज छाननी, तर ७ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आरे, बापर्डे, बुरंबावडे, चाफेड, चांदोशी, दाभोळे, दहिबांव, गवाणे, गिर्ये, गोवळ, हडपीड, हिंदळे, कट्टा, खुडी, किंजवडे, कोटकामते, कुणकवण, कुवळे, महाळुंगे, मणचे, मिठमुंबरी, नाद, नारिंग्रे, ओंबळ, पडेल, पाटगांव, पेंढरी, फणसे, पोंभुर्ले, पोयरे, साळशी, सांडवे, सौंदाळे, तोरसोळे, उंडील, वाघिवरे, वाघोटण, विजयदुर्ग आदी ३८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
.................
कुडासेत रविवारी ‘सॉफ्टबॉल’ निवड
दोडामार्ग, ता. १० : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशनच्यावतीने सबज्युनियर सॉफ्टबॉल मुले व मुली निवड चाचणी कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कुडासे येथे रविवारी (ता. १३) सकाळी १० वाजता होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेसाठी खेळाडूंनी येताना वयाचा पुरावा व आवश्यक साहित्यासह उपस्थित राहावे. स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००८ नंतरची असावी. निवड चाचणीतून निवडलेला संघ १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान औरंगाबाद येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होईल. स्पर्धेसाठी खेळाडूंनी जिल्हा सचिव अजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा हौशी सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, जिल्हा सचिव अजय शिंदे यांनी केले आहे.
..............