फुटबॉल संघात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल संघात निवड
फुटबॉल संघात निवड

फुटबॉल संघात निवड

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

राष्ट्रीय मिनी फुटबॉल संघात
रत्नागिरीच्या दोन खेळाडूंची निवड

रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी जिल्हा मिनी फुटबॉल संघातर्फे १३ ते १५ नोव्हेंबरला गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १७ वर्षाखालील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल उद्यमनगर-रत्नागिरीचा असद अजीज वागले, तर १४ वर्षाखालील सेंट थॉमस हायस्कूल कारवांचीवाडीचा मल्लिकअर्जून हनुमंता चत्तनली यांची निवड झाली आहे. खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन फैरोज मजगावकर, उपाध्यक्षा लाल्या सुर्वे, सचिव अमजद काद्री, सहसचिव सचिन घाग, खजिनदार समिर मजगांवकर व सदस्य अकिल साखरकर, असिफ शेख, चेतन उत्तेकर आणि प्रशिक्षक संकेत सावंत यांनी अभिनंदन केले आहे.