31 गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

31 गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा
31 गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा

31 गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा

sakal_logo
By

(टुडे पान २ साठीमेन)

३१ गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा

राजापूर तालुका ; राजकीय हालचालींना वेग
सकाळ वृत्तेसवा ः
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या असून त्यासाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. नव्या वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार असल्याचे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीमुळे गावांतील वातावरण तापणार असून निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न् बसतो तोच दुसऱ्‍या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासह २४९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नाटे, साखरीनाटे, पाचल या अकरा सदस्यीय, तर मिठगवाणे, नाणार, तळवडे, साखर, कळसवली, कोतापूर, ओझर, जुवाठी, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली या नऊ सदस्यीय, तर उर्वरित अठरा ग्रामपंचायती सात सदस्यीय आहेत. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नव्या वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वर्चस्व ताकद दाखवित प्रस्थापित करण्याची संधी गाव पुढाऱ्‍यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्राप्त झाली आहे. निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्यासह उमेदवारी निवडीमध्ये राजकीय पक्ष नेतृत्वासह गावपुढारी गुंतल्याचे चित्र गावागावांमध्ये दिसत आहे.


निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती

मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटुळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली


दृष्टीक्षेपात राजापूर ः
एकूण ग्रामपंचायती ः ३१
एकूण प्रभाग ः ९६
एकूण सदस्य ः २४९