हेमश्री चिटणीस फेलोशिपसाठी पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेमश्री चिटणीस फेलोशिपसाठी पात्र
हेमश्री चिटणीस फेलोशिपसाठी पात्र

हेमश्री चिटणीस फेलोशिपसाठी पात्र

sakal_logo
By

61683
हेमश्री चिटणीस

हेमश्री चिटणीस फेलोशिपसाठी पात्र
सावंतवाडी ः युजीसी मार्फत राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘नेट-जेआरएफ’ ही परीक्षा सावंतवाडीच्या हेमश्री चिटणीस या मराठी विषयातून उत्तीर्ण झाल्या असून त्याचसोबत त्या ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठीही पात्र ठरल्या आहेत. सध्या देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. मालवण येथील निवृत्त मुख्याध्यापिका सुवर्णलता मांजरेकर आणि सांडवे हायस्कूलमधील निवृत्त क्रीडा शिक्षक काशिनाथ मांजरेकर यांच्या कन्या असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी कर्मचारी महेश चिटणीस व मनीषा चिटणीस यांच्या स्नुषा आहेत. यापुर्वी त्या एप्रिल २०२१ मध्ये मराठी विषयातूनच ‘सेट’ही परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे या दुहेरी यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
--
61682
श्री देव कुडाळेश्वर

कुडाळेश्वरचा उद्या जत्रोत्सव
कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर देवतेची वार्षिक जत्रा रविवारी (ता.१३) होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवस रात्री श्री देव कुडाळेश्वर महाराजांना नारळ-केळी ठेवणे, नवस फेडणे, नवीन नवस करणे चालू राहील. जत्रेनिमित्त रात्री दहाला पुराण वाचन होईल. अकराला श्री देव कुडाळेश्वर महाराजांची ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक होईल. त्यानंतर रात्री साडेबाराला वालावलकर दशावतारी नाटक मंडळीचे पौराणिक नाटक व दहि पहाटे दहिकाला होऊन जत्रेची सांगता होईल. सर्व भक्तानी या वार्षिक जत्रौत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.