माणगावमध्ये युवासेनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगावमध्ये युवासेनेच्या 
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
माणगावमध्ये युवासेनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

माणगावमध्ये युवासेनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

61686
माणगाव ः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.

माणगावमध्ये युवासेनेच्या
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
कुडाळ ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवासेना शिवसेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माणगावमधील युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना विभाग संघटक कौशल जोशी, शिवसेना उपविभागप्रमुख बापू बागवे, बंड्या कुडतरकर, माजी सरपंच बच्चू नाईक, युवासेना विभागप्रमुख रुपेश धारगळकर, सचिन भिसे, एकनाथ धुरी, शैलेश विरनोडकर, बंटी भिसे, अजित करमळकर, राजू तामाणेकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन भिसे, शांतनू धुरी, शिवसेना घावनळे विभागप्रमुख रामा धुरी, श्रीराम पाडगावकर, साई नार्वेकर, उमेश देसाई आदी उपस्थित होते. या शिबिरास शिवसेना तालुका संघटक बबन बोबाटे, शिवसेना नेते अतुल बंगे, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे, युवासेनेचे राजू गवंडे आदींनी भेट दिली. युवासेना शिवसेनाच्या वतीने शिबिराला आलेल्या टीमचे आभार मानले तसेच बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यात इतर ठिकाणीही कार्यक्रम राबविणार असल्याचे युवासेनेचे पदाधिकारी धुरी यांनी सांगितले.
------------
61685
कुडाळ ः नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन करताना शिक्षक भारतीचे पदाधिकारी.

पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चव्हाण
कुडाळ ः तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात शिक्षक भारतीचे राज्य कार्यकारणी सदस्य सी. डी. चव्हाण यांची अध्यक्ष तर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विलास पालकर यांची उपाध्यक्षपदी १० विरुद्ध ५ अशा बहुमताने निवड झाली. शिक्षक भारतीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व समावेशक शिक्षण सहकार पॅनलचे निवडून आलेले संचालक सुनील नाईक, विद्यानंद पीळणकर, उमेश सावंत, श्रद्धा कुलकर्णी, निखिल ओरोसकर, गिरीश राऊळ, गिरीश गोसावी, दीपक तारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते प्रसाद पडते, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष काळे, अनिकेत वेतुरेकर, विलास म्हापणकर यांनीही भेट घेऊन अभिनंदन केले.