कौशल्य प्राप्तीसह जीवन समृद्धीचे व्यावसायिक धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौशल्य प्राप्तीसह जीवन समृद्धीचे व्यावसायिक धडे
कौशल्य प्राप्तीसह जीवन समृद्धीचे व्यावसायिक धडे

कौशल्य प्राप्तीसह जीवन समृद्धीचे व्यावसायिक धडे

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat११p९.jpg-
६१६७८
चिपळूण : जन शिक्षण संस्थान योजनेंतर्गत आयोजित जीवन समृद्धी शिक्षण सत्रात बोलताना जनशिक्षण संस्थान रत्नागिरीच्या संचालिका सीमा यादव.

कौशल्य प्राप्तीसह जीवन समृद्धीचे व्यावसायिक धडे

जन शिक्षण संस्थान ; चिपळुणात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : जन शिक्षण संस्थान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात कौशल्याधारित प्रशिक्षणे सुरू झाली आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थींच्या व्यक्तिमत्व आणि ध्येय उद्दिष्टांना एक दिशा देण्यासाठी जीवन समृद्धी शिक्षण सत्राचे आयोजन चिपळुणच्या कारेकर सभागृहात करण्यात आले. जन शिक्षण संस्थान व उमा सोशल वेल्फेअर इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला मोठी उपस्थिती होती.
या वेळी जनशिक्षण संस्थान रत्नागिरीच्या संचालिका सीमा यादव, कार्यक्रम अधिकारी निधी सावंत, उमा सोशल वेल्फेअर इन्स्टिट्युटच्या संस्थापिका उमा म्हाडदळकर, ध्येय अॅकॅडमी संस्थापक पूजेश्वरी कदम, आरपीज अॅकॅडमी संस्थापक राधेय पंडित, दिशान्तर संस्थाध्यक्ष राजेश जोष्टे प्रमुख उपस्थित होते.
जन शिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. माजी मंत्री सुरेश प्रभू व सौ. उमा प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी होत आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अंगी काही कौशल्यांची आवश्यकता असते. प्रश्नांवर उत्तरं शोधण्याची तयारी, समयसूचकता, समयोचित संवाद, कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, नवे तंत्र आणि बदलत्या बाजारपेठेतला मंत्र अशा साऱ्याची आवश्यकता असते. म्हणूनच जन शिक्षण संस्थानने आपल्या लाभार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. केवळ व्यावसायिक कौशल्य देऊन जन शिक्षण संस्थान थांबणार नाही तर यातून व्यावसायिक उभे राहतील यासाठी प्रयत्नशील राहील असे उद्गार संचालिका सीमा यादव यांनी काढले.
व्यावसायिक मूल्य म्हणजे नेमके काय? त्याचे मूलभूत नियम याबाबत पूजेश्वरी कदम यांनी मार्गदर्शन केले. राधेय पंडीत यांनी सोशल मिडिया हा व्यावसायिक यशासाठी कशा पद्धतीने प्रभावी वापरता येऊ शकतो, याचे विवेचन केले. जगात उपलब्ध होणारं ज्ञान स्मार्ट फोनमधून मिळवता येईल ज्याचा उपयोग आपण व्यवसाय वृद्धीकरिता करायला हवा, असे त्यांनी सांगितले. उमा म्हाडदळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रशिक्षक सुनिल डिंगणकर, ऋतूजा डिंगणकर, मृणाल सावंत, वैष्णवी भोसले, अर्पिता परब, समरीन सरगूरोह, तस्लीमा मुकादम, इफ्रा झोंबरकर, करीश्मा सागवेकर, स्नेहल धांगडे आदी उपस्थित होत्या.


कौशल्याधारित शिक्षणाला उत्तेजन
राजेश जोष्टे यांनी मेक्लाय शिक्षण पद्धतीमुळे आपण आपल्या समृद्ध शिक्षण पद्धतीला बाजूला सारलेच पण महात्मा गांधीजीनी सांगितलेल्या थी्र एच (हेड, हार्ट व हँड)ला देखील विससलो. ज्यामध्ये एक एच हा कौशल्याचा पुरस्कर्ता आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा एकदा कौशल्याधारित शिक्षणाला उत्तेजन जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून मिळते आहे, हे शुभसूचक असल्याचे गौरवोद्गार काढले.