डीएड बेरोजगारांसाठी संघटनेची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीएड बेरोजगारांसाठी संघटनेची स्थापना
डीएड बेरोजगारांसाठी संघटनेची स्थापना

डीएड बेरोजगारांसाठी संघटनेची स्थापना

sakal_logo
By

61696
स्वराली वाक्कर, सहदेव पाटकर, गौरी आडेलकर, तेजस देसाई, विजय फाले

डीएड बेरोजगारांसाठी संघटनेची स्थापना

अध्यक्षपदी फाले; विविध मुद्द्यांवर देणार लढा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० : डी. एड. बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विजय फाले यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जिल्हास्तरीय डीएड, डीटीएड बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्ग या नावाने संघटना स्थापन करण्यात आली.
कार्यकारणी अशी : अध्यक्ष : विजय फाले (दोडामार्ग), उपाध्यक्ष : स्वराली वाक्कर (कुडाळ), सचिव : सहदेव पाटकर (कुडाळ), सहसचिव : गौरी आडेलकर (कुडाळ), खजिनदार : नाना देसाई (दोडामार्ग), सल्लागार : तेजस देसाई (दोडामार्ग). सदस्य : गणपत डांगी (दोडामार्ग), शिवप्रसाद नाटेकर (दोडामार्ग), श्रुती तारी (सावंतवाडी), विलास जंगले (सावंतवाडी), सुरेश ताटे (दोडामार्ग), अमृता तेली (कुडाळ), देऊ धोंड (वेंगुर्ले), गौरवी महाजन (दोडामार्ग), मिनल कदम (सावंतवाडी), सोनाली कोदे (मालवण), निलेश तीर्लोटकर (देवगड).
संघटनेच्या मागण्या अशा ः स्थानिक पदवीधारकांना प्राधान्य देऊन पूर्वीप्रमाणे सेवा आयोजन कार्यालयामार्फत जिल्हा निवड मंडळामार्फत स्थानिक पातळीवर डीएडच्या मेरीट प्रमाणेच स्थानिकांमधूनच शिक्षक भरती करावी, टीईटी परिक्षेत महाराष्ट्र राज्यात बोगस प्रमाणपत्रांचा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे टीईटी परीक्षा मारक आहे, अशा परीक्षेवर आता कोणाचाही विश्वास राहिला नाही. गेली दहा वर्षे केवळ ही परीक्षा घेऊन फक्त तिजोरीच भरली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेली ‘टीईटी’ ही अट रद्द करून जिल्हा पातळीवर एकच परीक्षा घेऊन किंवा पदविका मेरीटचा विचार करून स्थानिकांमधूनच शिक्षक भरती करावी, ० ते २० पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद केल्यास शिक्षक भरती प्रक्रिया बंद होणार असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे आणि सहाजिकच त्याचा विपरीत परिणाम डीएड पदविका पूर्ण केलेल्या, गेली दहा वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार युवक युवती यांच्यावर पडून ते देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील वाडीवाडीत गेली कित्येक वर्षे असणाऱ्या मराठी शाळा बंद करून बालकांना शिक्षणापासून वंचित करू नये, आदी मागण्या करण्यात आल्या.
---
इतर काही मागण्या
जिल्हा परिषद गट-क संवर्ग सर्व पदांची भरती शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीमार्फत आहे; पण शिक्षक हे पद गट-क वर्गात असूनही त्यातून वगळले आहे. त्यामुळे शिक्षक पद त्यात समाविष्ट करून जिल्हास्तरावर स्थानिकांमधून भरती करावी, सिंधुदुर्ग डोंगरी भागाचे निकष, बोलीभाषा आणि गुणवत्तेवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून स्थानिकांमधूनच शिक्षक पदे भरावी, गेली दहा वर्षे भरती न झाल्यामुळे स्थानिकांधून भरती न केल्यास डीएड पदविका शासनाला दिल्या जातील. अशा अनेक विषयांवर चर्चा करून न्यायासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी संघटनेने दिला.