कंपनीत स्थानिकांना प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीत स्थानिकांना प्राधान्य
कंपनीत स्थानिकांना प्राधान्य

कंपनीत स्थानिकांना प्राधान्य

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat११p१४.jpg-
६१७०६
कालभैरव

ग्रामदैवत भैरी मंदिरात बुधवारी कालभैरव जयंती

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई- पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे कालभैरव जयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त येत्या बुधवारी (ता. १६) विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याच दिवशी सकाळी ७.३० वा. बारा वाड्यांच्या वतीने श्रीदेव भैरीवर अभिषेक, सकाळी ८,३० वाजता होमहवन व सत्यनारायण पूजा, सकाळी ९.३० वा. कालभैरवाष्टक पठण होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत भजन, कीर्तनाचे आयोजन केले आहे. यामध्ये श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई बुवा भगवान लोकरे, दुपारी २ ते ४ श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (रत्नागिरी), बुवा रोशन ढवण, सायंकाळी ४ ते ५.३० वाजता कीर्तनकार ह.भ.प. किरण जोशी कीर्तन करतील. सायंकाळी ६ ते ८ श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे रत्नागिरी), बुवा विजय मयेकर आणि रात्री ९ ते ११ या वेळेत श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार), बुवा सुदेश नागवेकर व रात्री ११ वाजता आरती आदी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र तथा मुन्ना प्रभाकर सुर्वे यांनी केले आहे.

गडनरळला विद्यार्थ्यांना देणार पुस्तकांची भेट

रत्नागिरी : स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील गडनरळ शाळेत विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे विविध विभागांत मदतकार्य सुरू आहे. शिक्षक व विद्यार्थ्याशी हितगुज करताना विद्यार्थ्याना वाचनाची आवड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे बौद्धिक पोषण योग्य रितीने व्हावे हा हेतू समोर ठेऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाळेसाठी ५० हून अधिक थोर विचारवंत, सामाजिक, आर्थिक विषयक, विनोदी लेखन, छोट्या मोठ्या कथा अशी विविध पुस्तके भेट स्वरूपात देण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून शाळेसाठी काही चांगल्या गोष्टी घडवून आणण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमास संस्थेचे मयुरेश चौघुले, रुपेश चौघुले, रितेश धनावडे, त्रिभुवन भातडे, गौरव चौघुले, अक्षय चौघुले, सागर धनावडे, आदित्य धनावडे, अंकुश धनावडे, परेश भातडे, सुर्यकांत चौघुले, शुभम चौघुले, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी कार्यकर्ते अमोल चौघुले, सुरेश धनावडे, राज धनावडे, साईराज धनावडे उपस्थित होते.


फोटो ओळी
-rat१p१५.jpg-

रत्नागिरी : विश्व हिंदू परिषदेच्या हितचिंतक अभियानानिमित्त आयोजित बैठकीस उपस्थित पदाधिकारी.

विश्व हिंदू परिषदेच्या हितचिंतक अभियानास प्रतिसाद

रत्नागिरी : हिंदू धर्मियांना अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभर हितचिंतक अभियान राबवले जात आहे. ६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानास रत्नागिरीमध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे ब्रीद जोपासलेल्या या संघटनेचे रत्नागिरीमध्ये अनेक हितचिंतक आहेत. यामध्ये वाढ होताना दिसत आहे. रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या हितचिंतक अभियानाचा आढावा घेण्यासाठी विहिंपचे क्षेत्र सेवाकार्यप्रमुख भार्गव सरपोतदार यांनी रत्नागिरीतील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शहरातील सर्व वस्ती आणि भागांमध्ये हितचिंतक अभियान कशाप्रकारे राबविले जात आहे, याची त्यांनी माहिती घेतली. सर्व कार्यकर्ते अभियानानिमित्त उत्साहाने लोकांशी संपर्क करत आहेत. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. हे अभियान समरसता आयाम प्रमुख भरत इदाते आणि बजरंग दलाचे विराज चव्हाण यांच्या माध्यामातून राबविले जात आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आणि हितचिंतकांनी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

नोकर भरतीत लक्ष्मी ऑर्गेनिककडून स्थानिकांना प्राधान्य

चिपळूण ः लोटेतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कंपनीने नमते घेत नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचा प्रकल्प उभारणीचे काम मागील दीड महिन्यापासून लोटे येथे सुरू आहे. या कारखान्याची मुख्य शाखा महाडला आहे. कंपनीने लोटेमध्ये येण्याचे ठरविल्यानंतर मागील दीड वर्ष स्थानिकांनी कंपनीला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले. मात्र कंपनीने उत्पादन सुरू करण्यापूर्वी प्रशासन विभागातील ५० कामगारांची भरती केली. ही भरती करताना महाड, श्रीवर्धन, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तरूणांची कंपनीत भरती करण्यात आली. त्यामुळे स्थानिक लोक आक्रमक झाले. आमचा कंपनीला विरोध नाही. कंपनीत एकूण २०० हून अधिक कामगार लागणार आहेत. कंपनीने जे परजिल्ह्यातील कामगार भरती केले आहे. त्या पात्रतेचे कामगार स्थानिक पातळीवरही उपलब्ध आहेत असे असताना बाहेरचे कामगार का घेण्यात आले, त्यांना काढून स्थानिकांना नोकरी दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला होता. पोलिस, महसूल आणि इतर सरकारी कार्यालयांना आंदोलनाची माहिती देण्यात आली होती. मात्र कंपनीने स्थानिकांना नोकर भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे कंपनीच्या विरोधातील आंदोलन मागे घेण्यात आले. अशी माहिती चंद्रकांत चाळके यांनी दिली.