सावंतवाडीत २१ ला महारक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत २१ ला महारक्तदान शिबिर
सावंतवाडीत २१ ला महारक्तदान शिबिर

सावंतवाडीत २१ ला महारक्तदान शिबिर

sakal_logo
By

61715
सावंतवाडी ः देव्या सूर्याजी यांचा सत्कार करताना बबन साळगावकर. शेजारी रवी जाधव, सुरेश भोगटे आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप )

सावंतवाडीत २१ ला महारक्तदान शिबिर

विविध संघटनांचे दात्यांना आवाहन; गोवा व सिंधुदुर्गचे जपले जाणार प्रेमाचे नाते

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना रक्त मिळवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येथील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर घेऊन गोवा व सिंधुदुर्गचे प्रेमाचे नाते जपले जाणार आहे, अशी घोषणा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली. हे शिबिर सोमवारी (ता.२१) सकाळी आठला येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित केले आहे. यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना व राष्ट्रीय छावा संघटना या चौघांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले आहे. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, देव्या सुर्याजी, संतोष तळवणेकर, रवी जाधव, सुरेश भोगटे, कल्याण कदम, संदिप नाईक, बंटी माठेकर, विजय पवार आदी उपस्थित होते.
यावेळी साळगावकर म्हणाले, ‘‘गोव्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे येणऱ्या काळात ही समस्या रुग्णांना भेडसावू नये, यासाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी गोवा मेडिकल कॉलेजचे ही सहकार्य राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताची सेवा मिळण्याबरोबर गोव्यात असलेल्या येथील लोकांना सुध्दा ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेवून जास्तीत-जास्त रक्तदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी या रक्तदान शिबिरामध्ये समाविष्ट होऊन महा रक्तदान शिबिर यशस्वी करावे.’’ यावेळी रक्तदान चळवळीत महत्वाची भूमिका घेणऱ्या सुर्याजी व तळवणेकर यांचा सत्कार करण्यात आला.