कणकवली : अपघात वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अपघात वृत्त
कणकवली : अपघात वृत्त

कणकवली : अपघात वृत्त

sakal_logo
By

फोटो : kan१११.jpg
६१७३१

बेळणे बस थांब्यावर
रिक्षा-मोटारीची धडक

रिक्षातील एक प्रवासी जखमी
कणकवली, ता.११ : मुंबई-गोवा महामार्गावरील बेळणे बस थांबा येथे आज इको कार (एमएच ०७ क्‍यू ५३६९) आणि रिक्षा (एमएच ०७ एएच २६१२) यांच्यात धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तर रिक्षामधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. त्‍याच्यावर कणकवली उपजिल्‍हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
इको कारमधून च॔द्रकांत सीताराम आमरसकर वय (वय ४०,रा.वैभववाडी) हे वैभववाडी ते कणकवली असे येत होते. बेळणे येथील मिडलकटवरून अचानक रिक्षा आल्‍याने कारची रिक्षाला मागाहून धडक बसली. या अपघातात रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली. तर अचानक ब्रेक लावल्‍याने इको कार रस्त्यालगतच्या खोलगट भागात जाऊन पलटी झाली. या अपघातात रिक्षा मधील प्रवासी जखमी झाला. त्‍याला तातडीने कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिक तसेच वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्त रिक्षा बाजूला केली आणि जखमी प्रवाशाला कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले.