एसटीचे नवे विभाग नियंत्रक रूजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीचे नवे विभाग नियंत्रक रूजू
एसटीचे नवे विभाग नियंत्रक रूजू

एसटीचे नवे विभाग नियंत्रक रूजू

sakal_logo
By

61733
कणकवली : विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांचे स्वागत करताना कामगार सेनेच्या पदाधिकारी.


एसटीचे नवे विभाग नियंत्रक रूजू

कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

कणकवली, ता.११ : सिंधुदुर्ग एस.टी.विभाग नियंत्रकपदी प्रशांत वासकर आज रूजू झाले. त्‍यांचे सिंधुदुर्ग जिल्‍हा एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी एसटीच्या अनेक समस्या नव्या विभाग नियंत्रकांसमोर मांडल्‍याची माहिती युवासेनेचे माजी जिल्‍हा प्रमुख ॲड.हर्षद गावडे यांनी दिली. तर जिल्ह्यातील परिवहन सेवा अधिक सक्षम करण्याची ग्‍वाही विभाग नियंत्रक श्री.वासकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग एसटी विभागाचे विभाग नियंत्रक पद गेले अनेक महिने रिक्‍त होते. या पदावर आज श्री.वासकर रूजू झाले. त्‍यांचे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी यांच्यासह ॲड. हर्षद गावडे व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, सहाय्यक वाहतूक अधिक्षक राजन भोसले, रामचंद्र काळे, अनंत टेमकर, प्रशांत खाडे, संभाजी खोत, प्रशांत माडकर, प्रज्ञा कदम, विनोद गवारी, हर्षवर्धन पाटील, गंगाराम गोरे, निलेश पाटील, सिताराम राणे, रुपेश सावंत, सुनिल चव्हाण, मुरलीधर जगताप, स्नेहल मुंज आदी उपस्थित होते.