राजापूर-पाचल-तळवडे नवीन पुलाची घोषणा हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-पाचल-तळवडे नवीन पुलाची घोषणा हवेत
राजापूर-पाचल-तळवडे नवीन पुलाची घोषणा हवेत

राजापूर-पाचल-तळवडे नवीन पुलाची घोषणा हवेत

sakal_logo
By

rat11p25.jpg
61759
राजापूरः पाचल-तळवडे पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
------------
पाचल-तळवडे पुलाची घोषणा हवेत
चार कोटीचे अंदाजपत्रक कागदावर; लोकप्रतिनिधींकडून पाहणीनंतर पाठपुरावाच नाही
राजापूर, ता. ११ : तालुक्यातील पाचल-तळवडे पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याची घोषणा अजूनही हवेतच आहे. नव्या पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार कोटी रुपये अंदाजपत्रक असलेला आराखडा तयार केला आहे.
गतवर्षी जुलैमधील अतिवृष्टीचा फटका बसून वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या अर्जुना नदीवरील तालुक्यातील पाचल-तळवडे पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याची घोषणा झाली होती. राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी पाहणी करून धोकादायक पुलाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र या घोषणेला वर्षभराचा कालावधी उलटला तरी पुलाच्या निधी मंजूरीसह उभारणीबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे त्यावेळच्या पुलाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी केलेल्या घोषणा केवळ घोषणाच ठरल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमध्ये धोकादायक झालेल्या या पुलाच्या ठिकाणी नव्या पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार कोटी रुपये अंदाजपत्रक असलेला आराखडा तयार केला आहे. मात्र त्याला अद्यापही निधी मंजूर झालेला नाही. गतवर्षी जुलै महिन्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये तालुक्यातील अनेक रस्ते, पुलांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये अर्जूना नदीवरील पाचल-तळवडे पुलाचाही समावेश आहे.
अतिवृष्टीनंतर नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी पुलाची पाहणी करून नवा पूल बांधण्याची घोषणा केली आणि आराखडा तयार करण्याची सूचना बांधकाम विभागाला केली होती. याप्रमाणे बांधकाम विभागाने सुमारे चार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मात्र त्याला अद्यापही निधीची तरतूद झालेली नाही. या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी न झाल्यास आणि सद्यस्थितीतील पुलाचा वापर चालू राहिल्यास तो अधिक धोकादायक होण्याची शक्यता आहे.

चौकट
तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरू
पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले मोठमोठे ओंडके आदळून या पुलाचे संरक्षण कठडे तुटून वाहून गेले. पुलावर मोठमोठे खड्डे पडताना पुलाचा काही भागही काही ठिकाणी खचल्यासारखा झाला होता. त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलावरून पाचलकडून तळवडे, ताम्हाणेसह जामदा परिसराकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने तत्काळ पुलाची तात्पुरत्या स्वरूपामध्ये डागडुजी केली होती. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून पुलावरून वाहतूक सुरू आहे.