पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्कार
पुरस्कार

पुरस्कार

sakal_logo
By

(पान ५ साठी, संक्षिप्त)

मुरादपूर ते कळकदरा रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर नाका ते कळकदरा रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सह-सचिव गणपत कदम यांनी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी रस्ता वेळेवर व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. संघटनेचे जिल्हाध्यक्ष तेजस भोपळकर, कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण वनकर, रफीक दोस्ती यांनी कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्याशी चर्चा केली होती. या कामाविषयी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित कामांची पूर्तता करून आठवडाभरात प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीला सुरवात होणार असल्याचे अमोल ओटवणेकर यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना सांगितले. डिसेंबर महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले आहे. हे काम वेळेत सुरू न झाल्यास वेळ प्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.


फोटो ओळी
-ratchl११४.jpg-
६१७६०
चिपळूण ः वामन कुलकर्णी यांना पुरस्कार वितरण करताना मंत्री रवींद्र चव्हाण

वामन कुलकर्णींना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

चिपळूण ः भाजपा शिक्षक कोकण आघाडीच्या वतीने प्रतिवर्षी (कै.) वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार गुणवंत शिक्षकांना दिला जातो. यावर्षी लवेल येथील विश्वनाथ विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अनुभवी व उपक्रमशील शिक्षक वामन कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. वामन कुलकर्णी हे गेली २३ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत.