तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांची बदली
तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांची बदली

तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांची बदली

sakal_logo
By

rat11p22.jpg
61729
अमेय पोतदार
---------

तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांची बदली
लक्षात राहणारी कारकिर्द ; कैद्यांशीही सलोखा
रत्नागिरी, ता. ११ः जिल्हा विशेष कारागृहातील कर्तव्य दक्ष आणि तरूण तुरूंग अधिकारी अमेय पोतदार यांची कल्याण तुरूंग अधिकारी म्हणून बदली झाली. पाच वर्षे ते रत्नागिरीत होते. कारागृहाची दरवर्षी साधारण ४० ते ५० लाख रुपयांची अशी करोडो रुपयांची कामे केली. बंदीवानासाठी पाणी पिण्याचे आर. ओ. मशीन आणले. कारागृहातील प्रत्येक बराकमध्ये बंद्यांना गरमच जेवण मिळण्यासाठी हॉटपॉट दिले. चपात्यांसाठी ऑटोमॅटिक मशीन, भात शिजवायला तब्बल ५० लिटरचा टिल्टींग कुकर अशी बरीच अभिनव कामे त्यांच्या कालावधित झाल्याने त्यांची कारकिर्दीत लक्षात राहणारी आहे.
अमेय पोतदार यांचे रत्नागिरीतील तुरूंग अधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती होती. २०१६ ला वयाच्या तेविसाव्या वर्षी ते रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये तुरुंग अधिकारी म्हणून दाखल झालो. कारागृहामधील वातावरण फारसे चांगले नव्हते. कर्मचारी - अधिकाऱ्यांमधील वाद, तक्रारी असे काहीसे तेव्हाचे वातावरण होते. परंतु कामाला सुरवात केली आणि बंद्याची मन जिंकून प्रत्येक बंद्याची आस्थेने चौकशी केली. कारागृहासारख्या रुक्ष ठिकाणी सरळ बोलणं बंद्याना अनपेक्षित नव्हते. तरी आपुलकीची विचारपूस त्यांच्या मनात घर करून गेली. मग बंदी देखील जवळ येऊ लागले आपलेपणाने बोलू लागले मनातील गोष्टी सांगू लागले. आपल्या अडीअडचणी सोडवून घेऊ लागले. कारागृह आणि बंद्याच्या मतपरिवर्तनासाठी जेवढ शक्य तेवढे करण्याचा पोतदार यांनी प्रयत्न केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कारागृहात ठेवलेली खोली संवर्धित करून तिचे नूतनीकरण केले. त्याचबरोबर नागरिकांना सावरकर कळावेत म्हणून सचित्र माहितीपट निर्माण करून तो खुला केला. वाळवी लागलेले जुने दस्तावेज जतन करून त्याचे डिजिटलायजेशन केलं. आज तोच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्ष पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे महत्त्व ओळखून आठ दहा वेळा सामान्य रुग्णालयातच रक्तदान केले. कोरोनाच्या काळात अखंड तीन महिने मोफत अन्नदान , असो की चिपळूण महापुरात मित्रांच्या मदतीने केलेले रेस्क्यू ऑपरेशन असो ते सर्वात सहभागी होते. मोठा मित्रपरिवार इथे त्यांनी जमवला.