नाथ पै यांचा वाचावा, भिनावा, घुमावा रंगला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाथ पै यांचा वाचावा, भिनावा, घुमावा रंगला
नाथ पै यांचा वाचावा, भिनावा, घुमावा रंगला

नाथ पै यांचा वाचावा, भिनावा, घुमावा रंगला

sakal_logo
By

(पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat११p२६.jpg-
६१७७२
राजापूर ः अभिवाचन करताना दीप्ती कानविंदे आणि स्वानंद देसाई.

‘वाचावा....भिनावा....घुमावा’तून उलगडले नाथ पै

राजापुरात कार्यक्रम ; कार्यक्रमाला दाद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : राजापूर नगर वाचनालय आणि मसाप शाखा राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट सर्कल रत्नागिरी निर्मित नाथ पै ‘वाचावा....भिनावा....घुमावा’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम नगर वाचनालयात झाला. दीड तास रंगलेल्या या कार्यक्रमामध्ये दीप्ती कानविंदे आणि स्वानंद देसाई यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून कोकणचे कैवारी नाथ पै यांचे कर्तृत्वाचा, अमोघ वक्तृत्वासह जीवनपट साऱ्यांसमोर उलगडून दाखविला.
नगर वाचनालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना वाचनालयाचे कार्यवाह मदन हजेरी यांनी, तर कलाकारांचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रदीप भाटकर, सुनील जठार, मानसी हजेरी, अनंत रानडे, नगर वाचनालयाचे कर्मचाऱ्‍यांसह रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवाचनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दीप्ती कानविंदे आणि स्वानंद देसाई यांनी नाथ पै यांच्या विविधांगी पैलूंचा उलगडा केला. अवघं ४८ वर्षाचं त्यांना लाभलेलं आयुष्य, त्यातील घटनांचे तपशील नीटनेटकेपणाने त्यांनी मांडले. त्यांनी स्वभाववैशिष्ट्यांसह अन्यायाविरूद्ध पेटून उठणारा, झोकून देवून काम करणारा एक थोर समाजवादी नेता त्यांनी हुबेहुब रसिकांसमोर उभा केला. केवळ २५ वर्षांचे असताना त्यांनी उच्च शिक्षणासाठी केलेला लंडन प्रवास, त्यावेळी त्यांना निरोप द्यायला आलेले हजारो मित्र यातून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. कोकणसाठी राजापूरात केलेले आंदोलन, ग्रामीण भागात छोट्या सभा घेवून कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, मच्छीमारांचे प्रश्‍न, शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही माहिती विविध उताऱ्‍यांतून त्यांनी वाचून दाखविली. त्यांची लोकसभेतील भाषणं, कोकण रेल्वेच्या प्रारंभाला त्यांनी काम आदींची माहितीही यावेळी देण्यात आली.