संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

(पान ५ साठी)

रत्नागिरीत मुलांची क्रिकेट निवड चाचणी

रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत १६, १९ आणि खुल्या गटातील मुलांची जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. १६ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी १४ व १५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे घेण्यात येणार आहे. १९ वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय निवड चाचणी १६ ला होईल. खुल्या गटाच्या मुलांची जिल्हास्तरीय निवड चाचणी १७ ला होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी या क्रिकेट निवड चाचणीसाठी सकाळी ९.३० वाजता मैदानात हजर राहावे. सोबत स्वतःचे क्रिकेट साहित्य, क्रिकेट गणवेश, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म दाखला झेरॉक्स व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. अध्यक्ष किरण सामंत, सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

फोटो ओळी
-rat११p२७.jpg-
६१७७३
चिपळूण ः ओमळी येथे ग्रामपंचायत कार्यालय कामाचे भूमिपूजन करताना विक्रांत जाधव.


ओमळीक विकास कामांचे भूमीपूजन

चिपळूण ः ओमळी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. बौद्धवाडी येथील विहीरीचे भूमिपूजनही करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शुभदा कदम, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता राजू जोशी, सोसायटीच चेअरमन सीताराम बांद्रे, व्हाईस चेअरमन संतोष चव्हाण, सरपंच प्रदीप घडशी, उपसरपंच अविनाश पवार आदी उपस्थित होते.