उर्वरित तीन तालुक्यांचीही निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उर्वरित तीन तालुक्यांचीही निवडणूक जाहीर
उर्वरित तीन तालुक्यांचीही निवडणूक जाहीर

उर्वरित तीन तालुक्यांचीही निवडणूक जाहीर

sakal_logo
By

उर्वरित तीन तालुक्यांचीही निवडणूक जाहीर

खरेदी विक्री संघाची रणधुमाळी; कणकवली, कुडाळसह वेंगुर्लेचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुका खरेदी विक्री संघांची पंचवार्षिक निवडणूक यापूर्वी जाहीर झाली आहे. उर्वरित तीन तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १० नोव्हेंबरला जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केल्या आहेत. निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या खरेदी विक्री संघांचा समावेश आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी, देवगड, वैभववाडीत आणि दोडामार्ग या पाच खरेदी विक्री संघांची निवडणूक यापूर्वी जाहीर केली आहे. या पाचही संघांची उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत संपली आहेत. यातील वैभववाडी आणि दोडामार्ग खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित तीन संघांसाठी नजीकच्या काही दिवसांत मतदान प्रक्रिया होणार आहे. मात्र, कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या तीन संघांची निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. सहकार विभागाने या तिन्ही संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यात वेंगुर्ले तालुका सहकारी खरेदी विक्री संघासाठी जिल्हा कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येथे ११ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मदत आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दाखल अर्जांची छाननी होणार आहे. २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ६ डिसेंबरला उमेदवारांना निशाणी वाटप होणार असून विधी ग्राह्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १६ डिसेंबरली सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.
शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कणकवली या संघासाठी सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येथे ११ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला दाखल अर्जांची छाननी होणार आहे. २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ६ डिसेंबरला उमेदवारांना निशाणी वाटप होणार असून विधी ग्राह्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १४ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या दरम्यान आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.
कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघासाठी जिल्हा कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येथे १४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मदत आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दाखल अर्जांची छाननी होणार आहे. २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ७ डिसेंबरला उमेदवारांना निशाणी वाटप होणार असून विधी ग्राह्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.
----------
चौकट
प्रत्येक संघातून पंधरा संचालक
मालवण, सावंतवाडी, देवगड, वैभववाडी, दोडामार्ग या पाच खरेदी विक्री संघासाठी एकूण पंधरा संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये संस्था मतदारसंघातून सहा संचालक निवडले जाणार आहेत. व्यक्ती मतदारांमधून चार संचालक निवडले जाणार आहेत. दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. इतर मागास प्रवर्ग एक, अनुसूचित जाती जमाती एक आणि विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी एक जागा राखीव राहणार आहे.
--------------
चौकट
अशी आहे स्थिती
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघासाठी संस्था मतदार ३९ तर व्यक्तिगत मतदार १२४४ असे एकूण १२८३ मतदार निश्चित झाले आहेत. वेंगुर्ला खरेदी विक्री संघासाठी २५ संस्था मतदार तर २९३४ व्यक्तिगत असे एकूण २९५९ मतदार निश्चित झाले आहेत. कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघासाठी तीन प्रकारचे मतदार आहेत. यात विकास संस्था मतदार, इतर संस्था मतदार व व्यक्तिगत सभासद मतदार असा समावेश आहे. त्यानुसार कणकवली संघासाठी विकास संस्था सभासद मतदार ३७, इतर संस्था सभासद मतदार १९ आणि वैयक्तिक सभासद मतदार ८२१ असे निश्चित झाले आहेत. कणकवली खरेदी विक्री संघासाठी एकूण ८७७ मतदार निश्चित झाले आहेत.