केसरकरांकडून तेरा वर्षांत शुन्य विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांकडून तेरा वर्षांत शुन्य विकास
केसरकरांकडून तेरा वर्षांत शुन्य विकास

केसरकरांकडून तेरा वर्षांत शुन्य विकास

sakal_logo
By

61786
बबन साळगावकर

केसरकरांकडून तेरा वर्षांत शुन्य विकास

बबन साळगावकर ः तलाठ्याची बदली करण्याचीही क्षमता नाही

सावंतवाडी, ता. ११ ः बेसिक सोडला तर तेरा वर्षांत मंत्री दीपक केसरकर यांनी शुन्य विकास केला. निवडणुका आल्या की हायमास्ट लावून मते मागणारे केसरकर त्यावेळी साधी तलाठ्याची बदली करू शकले नाहीत. हेच त्यांच्या आणि माझ्यातील वादाचे कारण ठरले, अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.
आजपर्यंत केसरकरांसोबत राहिलेले मोठ्या पदापर्यंत का गेले नाहीत? का मोठे होऊ शकले नाहीत?, केसरकरांनी कोणाला मोठे व्हायलाच दिले नाही. त्यामुळे जिल्हा बँक संचालक विद्याधर परब केसरकरांसोबत राहून कधीच मोठे होऊ शकणार नाहीत आणि राहीलेच तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, असेही साळगावकर म्हणाले. साळगावकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांनी साळगावकर यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देताना बोलत होते.
ते म्हणाले. ‘‘शहरातील मल्टीस्पेशालिटीचा नारळ फोडण्याआधी आवश्यक गोष्टींचा विचार करणे गरजेचे होते. निधी मंजूर केला म्हणून विकास होत नाही, हे प्रवक्त्यांना जणू माहीत नसेल, त्यामुळे मल्टीस्पेशालिटीसाठी एकाच जागेवर अडून बसण्यापेक्षा शहरातील बाहेरचा वाडा येथे आरक्षित असलेली जागा संपादित करण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा. शहराचा विचार करता साध्या साध्या प्रश्नांवरून जनतेला आंदोलने करावी लागतात. वीज प्रश्नावरून जनतेचा संताप उडताना लोकप्रतिनिधी या नात्याने ते सरकारने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे धाडस का केले नाही? निवडणुका आल्या की हायमास्ट लावायचे आणि मते मागायची हा त्यांचा नेहमीचाच कार्यक्रम राहिला आहे. शहरातील रघुनाथ मार्केटमध्ये आजपर्यंत कितीवेळा व्यावसायिक बसले? केवळ निवडणुकीपुरती ते चालू करून लोकांना आश्वासित करायचे हेच काम केसरकर करू शकले.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सोनुर्ली माऊली मंदिरातील चोरीचे काय झाले? आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर केसरकरांनी वरवंटा फिरवला; मात्र, तेथील ग्रामस्थांना ते न्याय देऊ शकले का? चोरीच्या तपासाचे काय झाले? केवळ प्रवक्तेगिरी केल्याने प्रश्न सुटत नाहीत. या ठिकाणी बेरोजगारी आहे. त्याचे काय? केसरकरांच्या नगराध्यक्ष ते मंत्रिपदाच्या वाटचालीत आमचे शेअर्स थोडे जास्त आहेत, हे कोणीच नाकारू शकत नाही. मी विचाराने चालणारा माणूस आहे. त्यामुळे केसरकरांसोबत असतानाही कधीच शिवबंधन बांधले नाही. केसरकारांसोबतचे कार्यकर्ते का मोठे होत नाहीत? विद्याधर परब हे केसरकरांसोबत राहून कधीच मोठे होऊ शकत नाहीत. ते त्यांच्यासोबत राहिले तर त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल. आजचे राजकारण हे दूषित झाले आहे. वृत्तपत्राला असलेली विश्वासहर्ता सोशल मीडियाने कमावली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या खोट्या बातम्या बंद करण्यासाठी पंतप्रधानांनी पाऊल उचलावे.
------------
चौकट
केसरकरानी तसे प्रतिज्ञापत्र द्यावे
मंत्री केसरकरांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत स्वार्थ साधला. आज ज्या शिंदे गटामध्ये राहून ते प्रवक्ते पदे सांभाळत आहेत आणि आमची शिवसेना खरी असल्याचे सांगत आहेत, त्या प्रवक्त्यांनी यापुढे आपण कधीच भाजपमध्ये जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्रच येथील जनतेला द्यावे, असे आव्हानही साळगावकरांनी केसरकरांना केले.