फलक फाडल्याच्या रागातून नांदगावात दोन गटांत राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फलक फाडल्याच्या रागातून
नांदगावात दोन गटांत राडा
फलक फाडल्याच्या रागातून नांदगावात दोन गटांत राडा

फलक फाडल्याच्या रागातून नांदगावात दोन गटांत राडा

sakal_logo
By

फलक फाडल्याच्या रागातून
नांदगावात दोन गटांत राडा

परस्परविरोधी संशयितांवर गुन्हे दाखल

कणकवली,ता. ११ ः असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांचा नांदगाव तीठा येथे लावलेला फलक फाडल्या प्रकरणी दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. मारहाणीची ही घटना १० नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास नांदगाव तिठा येथे पर्यायी रस्त्यावर घडली.
याबाबत गुरुप्रसाद गणपत वायंगणकर (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमलेश सुरेश मोरये (वय ३८, रा. नांदगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नांदगाव येथील पुलाखालील पर्यायी रस्त्याजवळ आपला फलक लावलेला होता. या फलकावर लाथ मारून थुंकूण त्याला आग लावली. याचा जाब विचारला असता शिविगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तर परस्पर विरोधात कमलेश मोरये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित गुरुप्रसाद वायंगणकर यांच्यासह सुरेश गणपत वांगणकर, रघुनाथ लोके, संतोष परब आणि प्रशांत परब (सर्व रा. असलदे) यांनी फलक काढल्याचा राग मनात धरून वरील पाचही संशयितांनी आपणास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे. परस्पर विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल असून अधिक तपास पीएसआय व्ही.एम. चव्हाण करीत आहेत.