चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील खड्डा जीवघेणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील खड्डा जीवघेणा
चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील खड्डा जीवघेणा

चिपळूण-बहादूरशेख नाक्यातील खड्डा जीवघेणा

sakal_logo
By

rat११p३०.jpg
६१८०१
चिपळूणः बहादूरशेख नाका येथे खोदलेला खड्डा.
----------
बहादूरशेख नाक्यातील खड्डा जीवघेणा
निर्मलाताई जाधव; पाईप न मिळाल्याने खड्डा तसाच
चिपळूण, ता. ११ः बहादूरशेख नाका येथे खोदून ठेवलेल्या खड्डयाने कोणाचा तरी बळी जाऊ शकतो. जर पाईप मिळत नव्हता तर खड्डा खोदून ठेवायचा तरी कशाला? तो खड्डा तत्काळ बुजवा, अशी मागणी कॉग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव यांनी केली आहे.
बहादूरशेख नाका येथे बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कमानीजवळ नगरपालिकेने खड्डा खोदून ठेवला आहे. पाण्याची पाईप लाईन फुटल्याने हा खड्डा सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खोदून ठेवला आहे. सिमेंट पाईप मिळत नसल्याने हा खड्डा उघडा आहे. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने आणि त्यातून गाड्याचा अपघात झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या संदर्भात येथील रहिवासी आणि कॉग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव यांनी खड्डा तत्काळ बुजवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात निर्मला जाधव म्हणाल्या, मुळात नगरपालिका प्रशासनाला हा पाईप मिळण्यासाठी पंधरा दिवस लागतात हेच अजब आहे. जर पाईप मिळत नव्हता, तर मग इतके दिवस खड्डा खोदून ठेवण्याचे कारण तरी काय?
काही महिन्यांपू्वी येथील जलवाहिनी फुटल्याने तिची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे जलवाहिनीची महिती पाणी पुरवठा विभागाला आहे. गळती झाल्यावर दोन महिन्यांनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला आहे. त्यासाठी अगोदर साहित्याची तजवीज न केल्याने पुरता खेळखंडोबा झाला आहे. जर हा खड्डा वेळीच बुजवला नाही तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.