बदलीसाठी 3 हजार 081 शिक्षकांची यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलीसाठी 3 हजार 081 शिक्षकांची यादी जाहीर
बदलीसाठी 3 हजार 081 शिक्षकांची यादी जाहीर

बदलीसाठी 3 हजार 081 शिक्षकांची यादी जाहीर

sakal_logo
By

बदलीसाठी ३ हजार ८१
शिक्षकांची यादी जाहीर
जिल्हा परिषद ; दहा वर्षे पूर्ण झालेले १५५९ शिक्षक
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र अशा ३ हजार ८१ शिक्षकांची यादी ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी (ता. ११) जाहीर केली आहे. यामध्ये एकाच क्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेत पाच वर्षे असे १ हजार ५५९ शिक्षक असून त्यांची बदली होणारच हे निश्‍चित आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. बदलीसाठी पात्र शिक्षकांची यादी चार दिवस उशिराने जाहीर झाली आहे. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांची माहिती संकलित करण्याचे काम लांबले होते. सहा जिल्ह्यांकडून दिलेल्या मुदतीमध्ये माहिती भरली नव्हती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी आणि सर्व शिक्षकांच्या यांच्या लॉगिनला उपलब्ध करून दिल्या आहेत. बदलीपात्र व बदली अधिकारपात्र यादीवरील आक्षेप शिक्षणाधिकाऱ्यांकडे नोंदवायाचे आहेत. त्यासाठी ग्राम विकास विभागाकडून मुदत दिली जाईल. जाहीर झालेल्या यादीमध्ये बदलीपात्र मराठी माध्यमाचे १,४२० आणि उर्दू माध्यमाचे १३९ असे मिळून एकूण १,५५९ शिक्षक आहेत. यामध्ये दहा वर्ष एका क्षेत्रात, पाच वर्षे एका शाळेत आणि सुगम क्षेत्रातील शाळेत पाच वर्षे असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. ऑनलाईन माहिती भरण्यात आल्यामुळे या शिक्षकांची बदली निश्‍चित होणार आहे. तसेच बदली अधिकारपात्र शिक्षकांमध्ये मराठी माध्यमाचे १,४२२ आणि उर्दू माध्यमाताचे ५० असे एकूण १,४७२ शिक्षक आहेत. यामध्ये अवघड क्षेत्रात तिन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचा समावेश असतो. या बदल्या संबंधित शिक्षकांवर अवलंबून असतात. त्यांना सुगम क्षेत्रातील शाळांमध्ये बदली मिळू शकते.
------------
चौकट
डिक्लेरेशन अर्जानंतर संवर्ग १ व २ ची यादी
बदली पात्र शिक्षकांची यादी झाल्यानंतर विधवा, परितक्त्या, आजारी यासह विविध गोष्टींसाठी पात्र ठरणाऱ्या संवर्ग १ आणि संवर्ग २ मधील यादी शिक्षकांनी डिक्लेरेशन अर्ज भरुन दिल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. डिक्लेरेशन अर्जाची मुदतही ग्रामविकास विभागाकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर जिल्ह्यांतर्गत बदल्यांची पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.