आदेश अवमानप्रकरणी कारवाईसाठी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदेश अवमानप्रकरणी
कारवाईसाठी उपोषण
आदेश अवमानप्रकरणी कारवाईसाठी उपोषण

आदेश अवमानप्रकरणी कारवाईसाठी उपोषण

sakal_logo
By

61811
भेडशी ः येथील ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषणास बसलेले ग्रामस्थ.

आदेश अवमानप्रकरणी
कारवाईसाठी उपोषण
साटेली भेडशी, ता. ११ ः अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या रस्ता खुला करण्याच्या आदेशाचा अवमान करून सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता बंद केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य नामदेव धर्णे यांनी त्या प्रभागातील ग्रामस्थांसह साटेली भेडशी ग्रामपंचायतीसमोर आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
साटेली येथील संबंधित वार्ड नंबरमधून जाणारा रस्ता वहिवाटबाबत अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या झालेल्या निर्णयानुसार रस्ता खुला करुन दिला होता; परंतु, तो रस्ता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करुन काहींनी तो रस्ता पुन्हा बंद केला, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या लोकांवर कारवाई व्हावी आणि रस्ता कायम स्वरुपी खुला करावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.