सावंतवाडी खरेदी विक्री संघासाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी खरेदी विक्री
संघासाठी आज मतदान
सावंतवाडी खरेदी विक्री संघासाठी आज मतदान

सावंतवाडी खरेदी विक्री संघासाठी आज मतदान

sakal_logo
By

सावंतवाडी खरेदी विक्री
संघासाठी आज मतदान
सावंतवाडी, ता. ११ ः येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (ता.१२) सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर एक तासाने मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत १४ जागांसाठी दोन्ही पॅनलचे २८ उमेदवार रिंगणात असून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
कळसुलकर हायस्कूलचे केंद्र मतदानासाठी निश्चित केले आहे. सहाय्यक निबंधक अनिल क्षिरसागर हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीत भटक्या विमुक्त गटातून दत्ताराम कोळमेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून त्यांनी श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल रिंगणात उतरवले आहे तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने सहकार वैभव पॅनल रिंगणात उतरवले आहे. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. संस्था मतदारसंघातून सहा जागा, वैयक्तिक सभासदातून चार जागा, महिलांमधून दोन जागा, ओबीसीमधून एक जागा, अनुसूचित जातीमधून एक जागा निवडून द्यावयाची आहे. यासाठी दोन्ही पॅनलनी प्रचारात आघाडी घेतली असून श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग व माजी नगराध्यक्ष संजू परब करत आहेत तर सहकार वैभव पॅनलचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व संघाचे अध्यक्ष सखाराम ठाकूर करत आहेत. या निवडणुकीसाठी शेतकरी वैयक्तिक मतदार ९२८ तर संस्था मतदार ३९ आहे. त्यामुळे संस्था मतदारसंघात प्रचंड रस्सीखेच असून या सभासदांची पळवा पळवी होऊ शकते, असे शक्यता व्यक्त केली आहे.