कोलगावात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलगावात जुगार अड्ड्यावर
छापा; पाच जण ताब्यात
कोलगावात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण ताब्यात

कोलगावात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण ताब्यात

sakal_logo
By

कोलगावात जुगार अड्ड्यावर
छापा; पाच जण ताब्यात

सावंतवाडी पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः कोलगाव जत्रोत्सवाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल २२ हजार ६३३ रुपयांचा रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई काल (ता.१०) रात्री कोलगाव-वेताळेश्वर मंदिराच्या परिसरात करण्यात आली. अनिल सुमन नाईक (वय ५५, रा. झिरंगवाडी), साईद नासीर शेख (वय ३४, रा. कोलगाव-फणसवाडी), दीपक न्हानू राऊळ (वय ४५, रा. कोलगाव-भोमवाडी), नितेश दत्ताराम म्हाडगूत (वय २९, रा. लाडाची बाग-सावंतवाडी), केतन पुरुषोत्तम देऊलकर (वय २९, रा. जुना बाजार-सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई खुद्द उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबतची फिर्याद सचिन कोयंडे यांनी दिली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंदिराच्या मागच्या परिसरात असलेल्या जंगल भागात अंधाराचा फायदा घेऊन हा जुगार सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सचिन कोयंडे, रामदास चव्हाण, सचिन सोनसुरकर आदींनी छापा टाकला.