स्‍मारक जागेची नौदलाकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍मारक जागेची 
नौदलाकडून पाहणी
स्‍मारक जागेची नौदलाकडून पाहणी

स्‍मारक जागेची नौदलाकडून पाहणी

sakal_logo
By

स्‍मारक जागेची
नौदलाकडून पाहणी
डोंबिवली, ता. ११ : कल्याण खाडीकिनारी नदी किनारा विकास प्रकल्पांतर्गत आरमार स्मारक उभारले जाणार आहे. स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्मारक उभारले जाणार असून भारतीय नौदलाची युद्धनौका टी ८० हीदेखील आता या स्मारकाचा एक भाग होणार आहे. भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात याविषयी सामंजस्य करार झाला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्प सल्लागार समितीचे प्रमुख सुनील भोकरे यांनी गुरुवारी कल्याण येथील स्मारकाच्या जागेची पाहणी केली. कल्याणच्या उल्हास नदीकिनारी आरमार स्मारकाच्या रूपात पुरातन असा वारसा स्मारक उभारण्याची कल्पना कल्याणचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून निघाली. कल्याणचा प्राचीन इतिहास व नाविक वारशाला साजेसे एक पर्यटन स्थळ निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.