वाढलेल्‍या झुडपांमुळे धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढलेल्‍या झुडपांमुळे धोका
वाढलेल्‍या झुडपांमुळे धोका

वाढलेल्‍या झुडपांमुळे धोका

sakal_logo
By

वाढलेल्‍या झुडपांमुळे धोका
रसायनी : रसायनीचे मुख्यालय वासांबे मोहोपाड्यावरून पनवेलकडे जाणाऱ्यांसाठी तळेगावमार्गे जवळचा रस्ता आहे. या रस्त्याच्याकडेला पावसाळ्यात वाढलेली झाडी-झुडपे अद्याप छाटली नसल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यामुळे अपघाताची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पानशिल ते बारवाई पुलापर्यंतचा रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढले आहे. यामुळे रस्ता असुरक्षित बनला असून वळण घेताना किंवा कडेचा अंदाज न आल्यामुळे वाहनांना अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वासांबे मोहोपाड्याहून पानशिलमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी हा रस्ता जवळ असल्याने मोहोपाडा आणि परिसरातील गावाकडून हलक्या वाहनांची वर्दळ असते. पानशिल गावाच्या हद्दीतील द्रुतगती राष्ट्रीय मार्गावरील पुलापासून ते बारवाईपुल सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत ठिकठिकाणी झाडी-झुडपे वाढलेली आहेत.