‘फॅन्सी ड्रेस’मध्ये नील बांदेकर प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘फॅन्सी ड्रेस’मध्ये नील बांदेकर प्रथम
‘फॅन्सी ड्रेस’मध्ये नील बांदेकर प्रथम

‘फॅन्सी ड्रेस’मध्ये नील बांदेकर प्रथम

sakal_logo
By

61869
दोडामार्ग ः नृत्य स्पर्धेतील विजेती संध्या कांबळेला गौरविताना मान्यवर.

‘फॅन्सी ड्रेस’मध्ये नील बांदेकर प्रथम

दोडामार्ग ‘दीपावली शो टाईम’; नृत्यात संध्या कांबळे विजेती

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ : येथील वक्रतुंड मित्रमंडळ, बाजारपेठ आयोजित दीपावली शो टाईमनिमित्त घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नील बांदेकर, तर लहान गटातील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत संध्या कांबळे विजेती ठरली. विजेत्या स्पर्धकांना मंडळातर्फे रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे वक्रतुंड मित्रमंडळातर्फे १५ वा ‘दीपावली शो टाईम’ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, अध्यक्ष मनोज पार्सेकर, खजिनदार प्रकाश मांजरेकर, विशाल मणेरीकर, राजेश फुलारी, सुदेश मळीक, विशाल चव्हाण, गोकुळदास बोंद्रे, शुभम गावडे, शिवम फुलारी, रोहन कुडतरकर, युवराज ऐनापूरकर, रोहित हळदणकर, राज गवस, राज बोंद्रे, कृष्णा परब, विघ्नेश आसोलकर, अभी ऐनापूरकर, अनिकेत आसोलकर, विराज मयेकर, लक्ष्मण खडपकर, समीर रेडकर, रोहन चव्हाण आदी उपस्थित होते.
यानिमित्त मंडळाने विविध स्पर्धा घेतल्या. त्यातील फॅन्सी ड्रेस स्पर्धा व एकेरी नृत्य स्पर्धा गुरुवारी (ता. १०) झाली. त्याचा निकाल असा: फॅन्सी ड्रेस स्पर्धा द्वितीय आरोही वेरेकर (फोंडा-गोवा), तृतीय प्रज्ञा कुडव (म्हापसा-गोवा), चतुर्थ-वीर नाईक (ओल्ड गोवा), उत्तेजनार्थ आरव आईर (पिंगळी, कुडाळ), स्वरा मळीक (लाडफे, गोवा), स्पृहा दळवी (घोटगे, दोडामार्ग), तसेच स्थानिक विजेता गौरांग कुंदेकर आदींनी क्रमांक प्राप्त केले. खुल्या एकेरी स्पर्धेतील विजेते असे: द्वितीय सोहम जांभोरे (सावंतवाडी), तृतीय अरोनिका सांगेलकर (गोवा), चतुर्थ दुर्वा पावसकर (कुडाळ), तर उत्तेजनार्थ आरव आईर (कुडाळ), निधी खडपकर (सावंतवाडी), काव्या गावडे (सावंतवाडी), स्थानिक विजेती आर्या दळवी (दोडामार्ग). विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण भरतनाट्यम अलंकार तुळशीदास आर्लेकर, गौरी पार्सेकर, संदीप गवस, उत्कर्षा मळीक आदींनी केले. शुभम धुरी यांनी सूत्रसंचालन केले.