‘जिव्हाळा’तील लाभार्थ्यांचा विविध कार्यक्रमांतून विरंगुळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जिव्हाळा’तील लाभार्थ्यांचा
विविध कार्यक्रमांतून विरंगुळा
‘जिव्हाळा’तील लाभार्थ्यांचा विविध कार्यक्रमांतून विरंगुळा

‘जिव्हाळा’तील लाभार्थ्यांचा विविध कार्यक्रमांतून विरंगुळा

sakal_logo
By

61872
माड्याचीवाडी ः जिव्हाळा सेवाश्रमतर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना राजेश तावडे. सोबत रमा तावडे, सुरेश बिर्जे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘जिव्हाळा’तील लाभार्थ्यांचा
विविध कार्यक्रमांतून विरंगुळा

कुडाळ, ता. १२ ः श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी रायवाडी या सेवाभावी संस्थेने आश्रमातील लाभार्थ्यांचा विविध कार्यक्रमांतून विरंगुळा केला.
श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट गेली सहा वर्षे सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. अपंग, निराधारांना आधार देण्याचे काम सुरेश बिर्जे व त्यांची टीम करत आहे. अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह ट्रस्टने सुमेध बिर्जे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान, तसेच मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेश तावडे, त्यांच्या पत्नी रमा तावडे, सुरेश बिर्जे, शोभा बिर्जे, रमेश सामंत, विष्णू खोबरेकर, सांगळे, श्रेया बिर्जे, गीतांजली बिर्जे, दत्तात्रय पाटकर, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, आर्या बिर्जे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यांनी आपल्या मनोगतात बिर्जे यांच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत इतरांनीही या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.