‘दशावतार’ टिकण्यासाठी प्रयत्न हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दशावतार’ टिकण्यासाठी प्रयत्न हवेत
‘दशावतार’ टिकण्यासाठी प्रयत्न हवेत

‘दशावतार’ टिकण्यासाठी प्रयत्न हवेत

sakal_logo
By

61877
पिंपरी-चिंचवड ः कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना अर्चना घारे-परब. शेजारी इतर.

‘दशावतार’ टिकण्यासाठी प्रयत्न हवेत

अर्चना घारे-परब ः पुण्यात नाट्यप्रयोगास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः दशावतार कला हा कोकणचा जीव आहे. ती टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले.
सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी-चिंचवड (पुणे) व संत तुकारामनगर पिंपरी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड येथे ‘शाप-प्रतिशाप’ या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. उद्‍घाटनप्रसंगी घारे-परब बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, कोकणातील मातीत रुजलेली आणि बहरलेली लोककला म्हणचे दशावतार. आज या नाट्यप्रयोगासाठी सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले आहे. ही गर्दीच सांगते की, आपल्या गावापासून, आपल्या माणसांपासून, आपल्या मातीपासून शेकडो किलोमीटर दूर राहून देखील कोकणी माणूस आपले कोकण, आपली माणसं आणि आपली संस्कृती विसरलेला नाही. कोकणी माणसाची नाळ आपल्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे, हेच यावरून सिद्ध होते.’’ या कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर गावडे, अमित वारंग, गजानन परब, महादेव बागवे, प्रशांत माळकर, सुधन गवस, प्रवीण राऊळ, कृष्णा गवस, सदाशिव मोरजकर, उमेश पंडित, संदीप धुरी, सुनील वझे आदींनी विशेष परिश्रम घेतले.