महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे
महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे

महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे

sakal_logo
By

(पान २ पान, अॅंकर)

महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित'' अभियान ः सर्वांगीण तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित'' अभियानांतर्गत जिल्हाभर सुरू असलेल्या सर्वांगीण तपासणीत जिल्ह्यातील १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे अधिक आढळली आहेत.
महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जिल्हाभर राबवण्यास सुरवात झाली. या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे असा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका, सेवक घरोघरी जाऊन माहिती देत आहेत. या अभियांनातर्गत १७ हजार ३१८ गरोदर माता, रक्तदाबाची १६ हजार ५४६, गरोदर, उच्च रक्तदाब निदान झालेल्या माताची संख्या ६९० आहे. थायरॉईडची तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थींची संख्या २ हजार ७२५, हायपर थायरॉईडचे निदान झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २३७, गरोदरपणा दरम्यानचा मधुमेह निदान झालेल्या २६१ मातांचा समावेश आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांची संख्या ३ हजार ४, टीडी लसीकरण केलेल्या गरोदर महिलांची संख्या ३ हजार २९८, कोविड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३ हजार २९८, विशेष मोहिमेत ७५२ अतिजोखीमग्रस्त माता सापडल्या. गर्भधारणापूर्व समुपदेशन ९६ हजार १८८ लाभार्थ्यांना दिले. १८ वर्षे वयोगटावरील महिलांना दिलेल्या सेवामध्ये तपासणी करण्यात आलेल्या १८ वर्षे वयोगटातील ५ लाख ७ हजार २३६ लाभार्थी आहेत. बीएमआय (१८.५ पेक्षा) कमी आढळलेले ४ लाख ७९ हजार ९१८ लाभार्थी आहेत. ४ लाख ५२ हजार ३६१ लाभार्थींची रक्तदाब तपासणी झाली. उच्च रक्तदाब निदान झालेल्या ३४ हजार २२१ लाभार्थी आहेत. २ लाख ८१ हजार ५८३ लाभार्थींची एचबी तपासणी केली. रक्तक्षय आढळलेले लाभार्थी १६ हजार ८५२ असून तीव्र रक्तक्षय आढळलेले लाभार्थीं १७०६ आहेत. मधुमेह निदान झालेले १३ हजार १५६ लाभार्थी आहेत.

१५२४ लाभार्थींना शस्त्रकियेसाठी सूचना

आधारकार्ड लिंकनुसार ३११ गरोदर मातांची नवीन बँकखाती उघडण्यात आली आहेत. आधारकार्ड नोंदणी २९९ मातांची करण्यात आली. मानसिक आरोग्य, तंबाखू, अल्कोहल आदींबाबत २ लाख ४५ हजार ८९० लाभार्थींना समुपदेशन करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील कान, नाक, घसा तपासणी ५८ हजार ८८४ महिलांची करण्यात आली तर ६० वर्षांवरील महिलांची डोळ्यांची ४३ हजार ४९० लाभार्थींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५२४ लाभार्थींना शस्त्रकियेसाठी सूचित केले आहे.