‘संचालक विस्तार शिक्षण’ पदभार डॉ. सावंतांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संचालक विस्तार शिक्षण’
पदभार डॉ. सावंतांकडे
‘संचालक विस्तार शिक्षण’ पदभार डॉ. सावंतांकडे

‘संचालक विस्तार शिक्षण’ पदभार डॉ. सावंतांकडे

sakal_logo
By

61943
पी. ए. सावंत

‘संचालक विस्तार शिक्षण’
पदभार डॉ. सावंतांकडे
वेंगुर्ले ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील शिक्षण विभागाचे कृषी विस्तार प्राध्यापक डॉ. पी. ए. सावंत यांच्याकडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या संचालक विस्तार शिक्षण या पदाचा कार्यभार दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दाभोलीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. ए. जी. मोहोड यांचा टेन्युअर कालावधी संपल्यामुळे त्या पदाची जबाबदारी डॉ. सावंत यांच्याकडे दिली आहे. आपल्या मूळ पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडताना १३ पासून पुढील आदेश होईपर्यंत हा पदभार आपण सांभाळावा, असे विद्यापिठाचे कुलसचिव भरत साळवी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.