रांगव धरण प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगव धरण प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावर
रांगव धरण प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावर

रांगव धरण प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावर

sakal_logo
By

रांगव धरण प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावर
रिंगरोडमुळे अधिक हानी ; सुरू कामातही दिरंगाई
चिपळूण, ता. १२ ः रांगव येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना कोणी वाली नाही याबाबत भाजपतर्फे जाब विचारण्यात आला. अपूर्णावस्थेतील रिंगरोडमुळे गेली कित्येक वर्षे शेतकर्‍यांना स्वतःच्या शेतात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पीक घेणे, आंबा, काजू आदी फळबाग लागवड करू न शकल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
गाजावाजा करत उभारलेल्या धरणाचा मुख्य उद्देश परिसरातील जमीन ओलिताखाली आणणे असा असताना धरणाचे बांधकाम पूर्ण होऊनही गेली १० वर्षे शेतकरी कॅनालच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पासाठी सोन्यासारखी जमीन सरकारी भावात देऊ केलेल्या नागरिकांना आज आपल्या हक्काचे पैसे इतक्या वर्षानंतरही मिळत नाहीत. किंबहुना भूसंपादनाचे जवळपास साडेतीन कोटी रुपये शासनदरबारी जमा होऊनदेखील गेली ५ वर्ष संबंधित जमीनमालकांना ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगून भाजपा संगमेश्वर सरचिटणीस डॉ. अमित ताठरे म्हणाले की आता आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. येत्या महिनाभरात मागे राहिलेली सर्व कामे मार्गी लावत आपण तातडीने जमीनमालकांना त्यांच्या हक्काचा मोबदला रक्कम अदा करावी अन्यथा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या साथीने आपल्याविरुद्ध भव्य लढा उभारू. या वेळी त्यांच्यासोबत रांगव प्रकल्पग्रस्त अनंत कुंभार, विरेश कुंभार आणि बूथप्रमुख अनंत दुदम उपस्थित होते.ताठरे यांनी आज पाटबंधारे प्रकल्प उपकार्यकारी अभियंता, चिपळूण राजेंद्र तांबे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे विविध कामांमध्ये चालू असणार्‍या कमालीच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. सोबतच कार्यालयीन कर्मचार्‍यांबाबत खडे बोल सुनावले.