16 जणांना सवलतीत धान्य नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

16 जणांना सवलतीत धान्य नको
16 जणांना सवलतीत धान्य नको

16 जणांना सवलतीत धान्य नको

sakal_logo
By

( पान ५ साठी, अॅंकर)

३० हजारापैकी केवळ १६ जणांना सवलतीत धान्य नको

राजापूर तालुका ; अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्त धान्य दुकानांतून सवलतींच्या दराने अन्नधान्याचे वाटप केले जाते. या अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून तालुक्यातील सुमारे ३० हजार लाभार्थ्यांपैकी केवळ १६ शिधापत्रिकाधारकांनी त्यास प्रतिसाद देत अन्नधान्नाच्या अनुदानातून बाहेर पडले आहेत. रास्त धान्य दुकानांमार्फत येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तसे अर्जही सादर केले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियान २०१९ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने शासकीय अन्नधान्यांचे वाटप सुरू आहे. यामध्ये अंत्योदयच्या प्रति शिधापत्रिकाधारकास २५ किलो तांदूळ व १० किलो गहू तर प्राधान्य कुटुंबातील प्रति व्यक्तीस ३ किलो तांदूळ व २ किलो गहू अल्पदराने दिला जातो. शासनाकडून काही महिन्यांपूर्वी शहरासह तालुक्यातील योग्य व गरजू लाभार्थ्यांची निवड करावी तसेच ग्रामीण व शहरी भागातील काही लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने अशा अपात्र लाभार्थ्यांची यादी स्थानिक प्रशासन व रास्त धान्य दुकानामार्फत पुरवठा कार्यालयाकडे सादर करावीत, अशा सूचना तहसीलदार व पुरवठा विभागाला करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात आले असून तसे अर्जही रास्त धान्य दुकानांमार्फत अपात्र लाभार्थ्यांकडून भरून घेतले जात आहे. तालुक्यामध्ये अंत्योदयची ४ हजार ४३७, तर प्राधान्याची २५ हजार ४७३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी पाचल, तळवडे, बुरंबेवाडी, कोदवली, दैतवाडी आदी गावांमधील केवळ १६ शिधापत्रिकाधारक या योजनेतून बाहेर पडले आहेत.