लोकअदालतीत १३६ प्रकरणे निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकअदालतीत १३६ प्रकरणे निकाली
लोकअदालतीत १३६ प्रकरणे निकाली

लोकअदालतीत १३६ प्रकरणे निकाली

sakal_logo
By

61972
सावंतवाडी ः राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‍घाटन करताना दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर आदी.

लोकअदालतीत १३६ प्रकरणे निकाली

सावंतवाडीत आयोजन; एकूण ३१ लाख रुपयांची वसुली

सावंतवाडी, ता. १२ ः सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण १३६ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून ३१ लाख ६ हजार २५९ रुपये वसूल करण्यात आले. आज एकूण १५८५ प्रकरणे ठेवली होती.
दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर, वेंगुर्लेसह दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‍घाटन झाले. यावेळी वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. पी. डी. देसाई, पॅनेल समिती सदस्य अॅड. जी. जी. बांदेकर, अॅड. स्वप्नील कोलगावकर, सहायक अधीक्षक प्रशासन स्नेहा सावंत आदी उपस्थित होते. यात वादपूर्व प्रकरणे १०२१ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९३ प्रकरणे निकाली होऊन ८ लाख ९२ हजार १९९ रुपये रक्कम वसूल झाली. न्यायालयीन प्रलंबित ५६४ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे निकाली होऊन २२ लाख १४ हजार ६० रुपये रक्कम वसूल झाली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक एन. एस. सावंत, एस. एस. सबनीस, तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपिक व्ही. एम. मीर आदी उपस्थित होते.