जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद
जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद

जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद

sakal_logo
By

जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्ले ः वेंगुर्ले विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त बुधवारी (ता. ९) शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशान्वये व तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ले हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियानांतर्गत नागरिकांच्या सक्षमीकरणासासाठी काढलेल्या फेरीमध्ये वेंगुर्ले हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक, न्यायालयीन कर्मचारी, वकीलवर्ग तसेच विधी स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही फेरी येथील दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा के. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ले दिवाणी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर उपस्थित होते.