साताऱ्यातील क्रिकेट स्पर्धेत ‘सावंतवाडी एम.’ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यातील क्रिकेट स्पर्धेत
‘सावंतवाडी एम.’ विजेता
साताऱ्यातील क्रिकेट स्पर्धेत ‘सावंतवाडी एम.’ विजेता

साताऱ्यातील क्रिकेट स्पर्धेत ‘सावंतवाडी एम.’ विजेता

sakal_logo
By

61977
पांचगणी ः विजेतेपद मिळविलेला सावंतवाडी एम. क्रिकेट अकादमीचा क्रिकेट संघ.

साताऱ्यातील क्रिकेट स्पर्धेत
‘सावंतवाडी एम.’ विजेता
बांदा, ता. १२ ः पांचगणी-सातारा येथे झालेल्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. जी. क्रिकेट अकादमी डोंबिवली (मुंबई) संघावर एम. क्रिकेट अकादमी सावंतवाडीने ४ गाडी राखून विजय मिळवित सलग दुसऱ्या वर्षी आर. सी. चषकावर नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकांत सर्व गडी बाद ८६ धावा जमविल्या. सावंतवाडी संघाने ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले आणि सामना ४ गडी राखून जिंकला. संपूर्ण स्पर्धेत सावंतवाडी संघाचा कर्णधार उस्मा खान, पराग आराबेकर, आमान शहा, आरुष डिसोझा, आरुष नेवगी, रितेश धामापूरकर, अर्णव तोरसकर, प्रसाद नाईक, संचित गावडे, पियुष सावंत, सुहान बांदेकर, हर्ष पांढरे यांनी अप्रतिम व सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले. संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करत ८ गडी बाद केलेल्या उस्मा खानला मालिकावीर, तर अर्णव तोरसकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देण्यात आली. या संघाला एम. क्रिकेट एकादमीचे प्रशिक्षक नील रेगे व अविनाश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.