सुरक्षारक्षकांना मिळाले तीन महिन्यांचे वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षारक्षकांना मिळाले 
तीन महिन्यांचे वेतन
सुरक्षारक्षकांना मिळाले तीन महिन्यांचे वेतन

सुरक्षारक्षकांना मिळाले तीन महिन्यांचे वेतन

sakal_logo
By

सुरक्षारक्षकांना मिळाले
तीन महिन्यांचे वेतन

मालवण तंत्रनिकेतनचे कर्मचारी

मालवण, ता. १२ : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या सुरक्षारक्षकांच्या थकीत वेतनप्रश्नी मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आज सुरक्षा रक्षकांच्या चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचे सुमारे पाच लाख रुपये सुरक्षा रक्षकांच्या खात्यात जमा झाले. वेतन मिळवून दिल्याबद्दल सुरक्षा रक्षकांनी इब्रामपूरकर यांचे आभार मानले.
शासकीय तंत्रनिकेतनमधील सात सुरक्षारक्षकांचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचे वेतन झाले नाही. हे वेतन मिळण्यासाठी सुरक्षारक्षकांनी दिवाळीपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले होते. सुरक्षारक्षक महेश सुर्वे, संजय गावडे, दिगंबर यादव, संजय देऊलकर, शिवदास परब, विनायक राणे, शरद पडवळ यांचे प्रलंबित वेतन मिळावे, म्हणून जुलैपासून तीन वेळा तंत्रनिकेतन प्राचार्यांनी तंत्रशिक्षण मंडळाला आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी अनुदान प्राप्त होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तरीही सुरक्षारक्षकांना वेतन मिळाले नाही.
याप्रश्नी सुरक्षारक्षकांनी मनसेचे इब्रामपूरकर यांचे लक्ष वेधले होते. इब्रामपूरकर यांनी प्राचार्य पाटील यांच्याशी संपर्क करत सर्व माहिती जाणून घेत तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ. कांबळे यांच्याशी दूरध्वनीवर सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ शासनाच्या अनुदानाअभावी येणार असल्याचे सांगितले. अनुदान त्वरित वितरीत करणे आपले काम असून आठ दिवसांत शासकीय तंत्रनिकेतन खात्यात जमा करा; अन्यथा मनसे स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला होता. यावर तंत्रशिक्षण मंडळाकडून अनुदानासंबंधी तातडीने दखल घेऊन पहिल्यांदा शासकीय तंत्रनिकेतन खात्यात जमा झाली. नंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग सुरक्षा मंडळाच्या खात्यावर जमा होऊन सातही सुरक्षारक्षकांचे एकूण चार महिन्यांचे एकत्रित सुमारे ६.७० लाखपैकी तीन महिन्यांचे ५ लाख रुपयांचे अनुदान संबंधितांच्या खात्यावर आज जमा झाले. शासकीय तंत्रनिकेतनच्या कंत्राटी सेवेचे मासिक बिल १.९० लाख रुपये आहे. हे अनुदान आज इतर तंत्रनिकेतन संस्थांच्या अखर्चित रकमेतून वितरीत करण्यात आले. याचे श्रेय इब्रामपूरकर यांना जात असल्याने सातही सुरक्षारक्षकांनी त्यांचे तसेच मनसे पक्षाचे आभार मानले.