‘विहिंप’ मालवण शाखेतर्फे हितचिंतक अभियान सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विहिंप’ मालवण शाखेतर्फे 
हितचिंतक अभियान सुरू
‘विहिंप’ मालवण शाखेतर्फे हितचिंतक अभियान सुरू

‘विहिंप’ मालवण शाखेतर्फे हितचिंतक अभियान सुरू

sakal_logo
By

62065
मालवण ः भरड दत्त मंदिर येथे विश्व हिंदू परिषदेच्या हितचिंतक अभियानात सहभागी मान्यवर.

‘विहिंप’ मालवण शाखेतर्फे
हितचिंतक अभियान सुरू
मालवण, ता. १३ : जगातील सर्वांत प्राचीन असलेला हिंदू धर्म भारतातच टिकून राहिला आहे. एकेकाळी हिंदू धर्मात संपन्न संस्कृती नांदत होती; मात्र कालांतराने त्याचे अधःपतन होण्यास सुरुवात झाली. विश्व हिंदू परिषदेने धर्म रक्षणाच्या कार्याचा विडा उचलला. परिषदेने पुढील काळात आपली धर्म रक्षणाची व्याप्ती वाढविताना अनेक आघाड्यांवर काम करायला सुरुवात केली. आज सुरू झालेले हितचिंतक अभियान याचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर दिघे यांनी केले. शहरातील भरड येथील दत्त मंदिर येथे विश्व हिंदू परिषद मालवण शाखेतर्फे हितचिंतक अभियानाचा प्रारंभ काल (ता. १२) सायंकाळी करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक डॉ. सुभाष दिघे, राजन बादेकर, मालवण प्रखंड मंत्री संदीप बोडवे, बबन परुळेकर, सतीश काजरेकर, उदय झाड, सुनील पोळ, योगेश सातार्डेकर, भिवा शिरोडकर, बाळू काजरेकर, संतोष कोचरेकर, बाबाजी कोचरेकर, प्रमोद करलकर, पूजा करलकर, संजय गोवेकर, भाऊ हडकर आदी उपस्थित होते. मालवण प्रखंड अध्यक्ष सामंत यांनी प्रास्ताविकात विश्व हिंदू हितचिंतक अभियानाविषयी माहिती दिली. संदीप बोडवे यांनी आभार मानले.