शिंदे, मोरजकरांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे, मोरजकरांचे अभिनंदन
शिंदे, मोरजकरांचे अभिनंदन

शिंदे, मोरजकरांचे अभिनंदन

sakal_logo
By

62069
ओरस : जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी निवड झालेल्या सुरेखा शिंदे, श्वेता मोरजकर यांचे अभिनंदन करताना पदाधिकारी.

शिंदे, मोरजकरांचे अभिनंदन
सावंतवाडी ः शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी सर्वानुमते वेंगुर्ले हायस्कूलच्या सुरेखा शिंदे, पोईप हायस्कूलच्या श्वेता मोरजकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हा बैठक ओरोस येथे राजेंद्र माणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी परिषदेचे नेते वेणुनाथ कडू, जिल्हा सचिव सलीम तकिलदार, एस. एम. सागडे, मुख्याध्यापक नंदन घोगळे, एन. पी. मानकर, भरत केसरकर, चंद्रकांत कानकेकर, एस. पी. कुळकर्णी, विश्वास वाघमोडे आदी उपस्थित होते. यावेळी आगामी शिक्षक आमदार निवडणुकीसाठी शिक्षकांना भेटून परिषदेचेच आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे आमदार वेणुनाथ कडू यांनाच विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. वाय. पी. नाईक यांनी आभार मानले.