‘स्मरण साखळी’चे १७ ला प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्मरण साखळी’चे १७ ला प्रकाशन
‘स्मरण साखळी’चे १७ ला प्रकाशन

‘स्मरण साखळी’चे १७ ला प्रकाशन

sakal_logo
By

१३
अण्णा केसरकर

‘स्मरण साखळी’चे १७ ला प्रकाशन

अण्णा केसरकर ः शिवसेनेच्या चढ-उतारांची यशोगाथा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शिवसेनेचा जन्म ते आजपर्यंतचा प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ-उतारांची यशोगाथा सांगणाऱ्या सावंतवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या ‘स्मरण साखळी’ पुस्तकाचे १७ ला प्रकाशन होणार आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी पत्रकार संघ आणि अण्णा केसरकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अण्णा केसरकर यांनी दिली.
यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या जन्मापासून मी पक्षात काम केले आहे. त्यामुळे या पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी नेमके कोणी-कोणी काम केले, याचा इतिहास सांगण्यासोबत माझ्या आयुष्यात झालेले सत्याग्रह, आंदोलने अशा अनेक आठवणींची माहिती देणऱ्या प्रसंगांना शब्दबद्ध केले आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री खलप यांच्यासोबत पत्रकार किरण ठाकूर, अण्णा ठाकूर, माजी आमदार शंकर कांबळी, भाई गोवेकर आदी उपस्थित राहणार आहेत.’’
लोंढे म्हणाले म्हणाले की, केसरकरांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असा आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजासाठी जीवन वाहिले. हा आपला जीवन प्रवास पुस्तकरुपाने समाजासमोर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचे सहकारी व समाजसेवकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.