कासार्डेत व्यक्तिमत्व विकास शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डेत व्यक्तिमत्व विकास शिबिर
कासार्डेत व्यक्तिमत्व विकास शिबिर

कासार्डेत व्यक्तिमत्व विकास शिबिर

sakal_logo
By

कासार्डेत व्यक्तिमत्व विकास शिबिर

विविध उपक्रम; प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तळेरे, ता. १३ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. संघाचे विचार समाजात दृढ करण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या सुटीत संघाच्या व्यक्तिमत्व शिबिर (प्राथमिक वर्गासाठी) ठरवला जातो. पूर्वी असा वर्ग नागपूर, मुंबई, पुणे मोठ्या शहरात होत असे. यावर्षी हा उपक्रम प्रथमच कासार्डे (ता. कणकवली) येथे २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत झाला. संपूर्ण जिल्ह्यातून अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
या वर्गाच्या निमित्ताने कासार्डे हायस्कूल येथे पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती व बुद्धजीवींना संघातर्फे संवादासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संघाची कार्यपद्धती, संघाचे विविध आयाम, देशभरात सुरू असलेली सेवा कार्ये, संघ कार्याची आज समाजाला असलेली गरज याबाबत माहिती दिली. यामध्ये दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, बबन नारकर, शांताराम तावडे, कल्पेश पाटील, उदय दुधवडकर, रवींद्र पाताडे, परशुराम झगडे यांनी चर्चेत भाग घेतला. हा वर्ग यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. प्रशिक्षणार्थ्यांची न्याहारी, भोजन, स्वच्छता, विश्रांतीची व्यवस्था याबाबत कटाक्षाने काळजी घेतली जात होती. वर्गाच्या अंतिम टप्प्यात ४ ला रात्री विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी भजन, गायन, अभिनयाद्वारे आपापले कलागुण सादर केले. ध्वजारोहण, शारीरिक व्यायाम, बौद्धिक खेळ, भारत मातेची प्रार्थना व ध्वजावतरण करून या प्राथमिक वर्गाची सांगता झाली.