वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल 
तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

sakal_logo
By

62152
वेंगुर्ले ः अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफीक बेग यांना नियुक्तीपत्र देताना शैलेश परब. शेजारी इतर.

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल
तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
वेंगुर्ले, ता. १३ ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफीक बेग यांची वेंगुर्ले अल्पसंख्यांक तालुकाप्रमुखपदी निवड झाली. यावेळी त्यांचे मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले.
शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज येथे शिवसेनेच्या मासिक सभेचे औचित्य साधून वितरित करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, रेडी उपसरपंच नामदेव राणे, रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर, विनोद राणे, प्रसाद रेडकर तसेच तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.