वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल 
तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

sakal_logo
By

62152
वेंगुर्ले ः अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफीक बेग यांना नियुक्तीपत्र देताना शैलेश परब. शेजारी इतर.

वेंगुर्ले अल्पसंख्यांक सेल
तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
वेंगुर्ले ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफीक बेग यांची वेंगुर्ले अल्पसंख्यांक तालुकाप्रमुखपदी निवड झाली. यावेळी त्यांचे मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज येथे शिवसेनेच्या मासिक सभेचे औचित्य साधून वितरित करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, रेडी उपसरपंच नामदेव राणे, रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर, विनोद राणे, प्रसाद रेडकर आदी उपस्थित होते.
--
62139
बांदा ः निमजगा महापुरुष देवस्थान येथे दीपोत्सव साजरा करताना ग्रामस्थ.

बांदा-निमजगा येथे दीपोत्सव
बांदा ः बांदा-निमजगा येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यावर्षी प्रथमच आयोजन असूनही ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभला. श्री देव महापुरुषाचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करुन दीपोत्सवाचा आरंभ झाला. महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित सहभाग घेतला. सर्वत्र पणत्या पेटविल्यानंतर आरती व प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर ‘शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या स्फूर्तिदायक प्रेरणामृताचे सामूहिक पठण करण्यात आले. सर्वांच्या कल्याणासाठी श्री देव महापुरुषाला गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाची सांगता झाली.
--
कणकवलीत १९ला संगीत महोत्सव
कणकवली ः शहरातील वसंतराव आचारेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पंडित जितेंद्र अभिषेके २३ वा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. येत्या १९ नोव्हेंबरला सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंडित शुभम यांचे शास्त्रोक्त गायन तसेच डॉ. अनिश प्रधान यांचा तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.