बालदिन विशेष- रत्नागिरीत आज निनादणार ''सूर निरागस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालदिन विशेष- रत्नागिरीत आज निनादणार ''सूर निरागस
बालदिन विशेष- रत्नागिरीत आज निनादणार ''सूर निरागस

बालदिन विशेष- रत्नागिरीत आज निनादणार ''सूर निरागस

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat13p1.jpg ःKOP22L62044
रत्नागिरी ः बालदिनानिमित्त आयोजित ''सूर निरागस'' मैफलीची तालिम करताना बालकलाकार.
----------
बालदिन विशेष ........... लोगो

रत्नागिरीत आज निनादणार ''सूर निरागस''

सबकुछ बालके ; ''स्वराभिषेक''चा बालदिन नजराणा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः निरागसता ही नेहमीच लोभस असते. इतर कोणत्याही विकार-विचारांचा स्पर्श त्याला झालेला नसतो. म्हणून ते निरागस. अशीच एक लोभस मैफल रत्नागिरीकर रसिकांचे कान तृप्त करणार आहे. गायक बालके, संवादिनी, तबला, पखवाज, तालवाद्यांची साथही बालकांचीच. निवेदनही कोणा बुजुर्गाचे नव्हे तर चुणचुणीत बालकांचेच. मैफलीचे ध्वनिसंयोजन, एवढेच नव्हे तर आयोजनही बालकच करणार, असा हा साज असल्याने मैफल ''सूर निरागस''.
ही केवळ एक टूम नाही. रंगमंचीय आविष्कारासाठी ताऊन-सुलाखून निघालेली ही बालके आपल्या निरागस; परंतु तयारीचे गायकी आणि साथीने ठसा उमटवतील हा आत्मविश्वास असल्यानेच बालदिनानिमित्त (ता. १४) ''स्वराभिषेक'' संगीतवर्गाने हे धाडसी पाऊल उचलले आहे. संगीतसंयोजन या साऱ्या छोट्या शिलेदारांना तयार करणाऱ्या विनया परब यांचे. सबकुछ बालक असलेली ही मैफल रसिकांसाठी आगळीवेगळी मेजवानी ठरणार आहे.
ऋषिकेश ढवळीकर (गोवा), आदित्य दामले, स्वरा भागवत, ऋग्वेदा हळबे आणि वेदिका गांधी हे बालकलाकार शास्त्रीय तसेच सुगम गायन करणार आहेत. त्यांना आदित्य पंडित, श्रीरंग जोगळेकर, ओजस करकरे, स्वरा भागवत आणि ऊर्जा आपटे हे विद्यार्थी संवादिनी, स्वरूप नेने, सारंग जोशी हे तबला, यश बने पखवाज तर अद्वैत मोरे तालवाद्याची साथ करणार आहे. ईशा रहाटे आणि स्वरा लाकडे या विद्यार्थिनी नियोजनाची बाजू सांभाळणार असून ध्वनिसंयोजन राधिका बेर्डे करणार आहे. प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले, संवादिनीवादक चैतन्य पटवर्धन यांच्यासह स्वराभिषेकचे पालक आणि वादक यांचे याकरिता सहकार्य लाभले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्वराभिषेकतर्फे करण्यात आले आहे.

चौकट
महिन्यातील एका सोमवारी विद्यार्थ्यांची मैफल
''स्वराभिषेक''तर्फे विनया परब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संगीतसाधक, शास्त्रीय गायक घडवण्याबरोबरच ''परफॉर्मिंग आर्टिस्ट'' तयार करण्यावरही सातत्याने भर दिला जातो. त्याकरिता दर महिन्यातून एका सोमवारी गायनवर्गातील विद्यार्थ्यांची मासिक मैफल सादर होते. गगनगिरी महाराज आश्रमाच्या सहकार्याने तेथील रंगमंचावर होणाऱ्या मैफलीचे नियोजनही विद्यार्थीच करतात. यातून त्यांना ''इव्हेंट मॅनेजमेंट''चे, तसेच येथील रंगमंचीय सादरीकरण आत्मविश्वासाने करण्याचे, गीतगायनाचे धडे मिळतात. गुरूपौर्णिमा, दिवाळी पहाट या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन हा या उपक्रमांचाच एक भाग असतो.