क्रिकेट शिबिरासाठी विश्वनाथ रेगे रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट शिबिरासाठी
विश्वनाथ रेगे रवाना
क्रिकेट शिबिरासाठी विश्वनाथ रेगे रवाना

क्रिकेट शिबिरासाठी विश्वनाथ रेगे रवाना

sakal_logo
By

62130
विश्वनाथ उर्फ पप्पू रेगे

क्रिकेट शिबिरासाठी
विश्वनाथ रेगे रवाना
सावंतवाडी, ता. १३ ः विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या १६ वर्षांखालील खेळाडूंच्या शिबिरासाठी येथील विश्वनाथ उर्फ पप्पू रेगे या खेळाडूची निवड करण्यात आली. तो काल (ता. १२) या शिबिरासाठी पुणे येथे रवाना झाला.
विश्वनाथ हा सावंतवाडीतील एम. क्रिकेट अॅकॅडमीचा खेळाडू आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या १६ वर्षांखालील खेळाडूंच्या इन्व्हिटेशन लीगमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करताना त्याने केलेली दर्जेदार कामगिरी तसेच सुपर लीगमधील सामन्यातील कामगिरीमुळे त्याची या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. तो येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला प्रशिक्षक पीटर सर, नागेश रेगे, अविनाश जाधव, जॅक अल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. विश्वनाथच्या या निवडीबद्दल एम. अॅकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष तथा बांदा सरपंच अक्रम खान, सर्व प्रशिक्षक व सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.