रत्नागिरी-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

sakal_logo
By

जिल्हा परिषद सेवानिवृत्तांची 17 ला सभा
रत्नागिरी ः जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण सभा १७ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी समितीने केले आहे.

स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे
विद्यार्थ्यांना ओळखपत्र
रत्नागिरी ः तालुक्यातील गडनरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला स्वराज्य युवा प्रतिष्ठान रत्नागिरीतर्फे विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळेतून शिक्षण घेत असलेल्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी चांगल्या माहित आहेत. त्यामुळे आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सुरू आहेत. यापुढेही शाळेसाठी विद्यार्थ्यांना ज्ञानोपयोगी ५० पुस्तके भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुरेश धनावडे, मयुरेश चौगुले, आदित्य धनावडे, परेश भातडे, अक्षय चौगुले, त्रिभुवव भातडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव चौगुले, शाळेतील शिक्षिका वासावे, संदीप शितप समितीचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.