दाभोळ-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा
दाभोळ-संक्षिप्त पट्टा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

घराला आग लागून लाखाची हानी
दाभोळ : दापोली तालुक्यातील जालगाव-ब्राह्मणवाडी येथील नितीन जाधव यांच्या घराला आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी (ता. ९) सकाळी ७.३० ते ११.३० या दरम्यान ही आग लागल्याची माहिती नितीन जाधव यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली आहे. बुधवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान घराला कुलुप लावून जाधव कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच दरम्यान अचानक घराला आग लागली. यामध्ये घरातील वॉशिंग मशीन, टीव्ही, महत्त्वाची कागदपत्रे, गृहोपयोगी वस्तू, कपडे असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. आग लागण्याचे कारण समजले नाही. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आकस्मित जळीत म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक नलावडे करीत आहेत.
-----------

वामन कुलकर्णींना वसंतस्मृती
आदर्श शिक्षक पुरस्कार
चिपळूण ः भाजपा शिक्षक कोकण आघाडीच्या वतीने प्रतिवर्षी (कै.) वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार गुणवंत शिक्षकांना दिला जातो. यावर्षी लवेल येथील विश्वनाथ विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अनुभवी व उपक्रमशील शिक्षक वामन कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला. वामन कुलकर्णी हे गेली २३ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत.