रत्नागिरी- एक दीप हिंदू राष्ट्रासाठी अभियानाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- एक दीप हिंदू राष्ट्रासाठी अभियानाला
रत्नागिरी- एक दीप हिंदू राष्ट्रासाठी अभियानाला

रत्नागिरी- एक दीप हिंदू राष्ट्रासाठी अभियानाला

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p६.jpg-KOP२२L६१८७५ दापोली ः लाडघर येथील श्री चंडिका मंदिरात दीप लावून प्रार्थना करताना हिंदुत्वनिष्ठ.
----------
एक दीप हिंदू राष्ट्रासाठी
अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, ता. १३ ः त्रिपुरारी पौर्णिमेला एक दीप हिंदू राष्ट्र स्थापनेसाठीही प्रज्वलित करा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने हिंदूंना केले होते. त्याला रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दीप लावून हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना करत ठिकठिकाणच्या हिंदूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दापोली येथील श्री चंडिका मंदिर, लाडघर येथे हिंदूत्वनिष्ठांनी सामूहिकरित्या दीप लावून प्रार्थना केली. हभप कालेकर महाराज यांनी स्वगृही परिवारासह दीप प्रज्वलित करून हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना केली. समाजमंदिर पार्था देवी, वारे बुवा मंदिर मळे आणि आगरवायंगणी गावचे उपसरपंच संतोष आंबेकर यांनी त्याचप्रमाणे एका स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिकपणे दीप लावले. लांजा येथील धनी केदारलिंग मंदिर, आसगे येथील धर्मप्रेमींनी तसेच चव्हाटा मंदिर, लांजाचे विश्वस्त अभय बामणे यांच्यासह ५४ हिंदुत्वनिष्ठांनी ठिकठिकाणी सामूहिकरित्या प्रार्थना करत दीपप्रज्वलन केले. राजापूर येथील हिंदुत्वनिष्ठ व्यापारी संदीप देसाई, अविनाश पाटणकर, विनायक सावंत यांच्यासह ओंकार मित्रमंडळाचे (राजापूर) अध्यक्ष विवेक गुरव यांनी दुकानात दीप लावून प्रार्थना केली. फुपेरे येथील ग्रामदेवता श्री अंबाबाई व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरातही उदय सावंत यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ मंडळींनी सामूहिकरित्या दीप लावून प्रार्थना केली. पन्हळे गावातील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या दीप लावले. खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिरात तेथील ग्रामवासियांनी दीप लावून हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली.