सावंतवाडीत आजपासून पोलिस भरती प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत आजपासून 
पोलिस भरती प्रशिक्षण
सावंतवाडीत आजपासून पोलिस भरती प्रशिक्षण

सावंतवाडीत आजपासून पोलिस भरती प्रशिक्षण

sakal_logo
By

सावंतवाडीत आजपासून
पोलिस भरती प्रशिक्षण
सावंतवाडी ः येथील महेंद्रा अॅकेडमीच्या माध्यमातून पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर मोफत पोलिस भरती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलिस भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यात भरतीसाठी तयारी कशी करावी, लेखी परीक्षा कशी द्यावी, मैदान चाचणी कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्राउंड व लेखीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना २०२२-२३ ची पोलिस भरती होईपर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जास्तीत-जास्त मुलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
---
मालवणात डिसेंबरमध्ये नृत्य स्पर्धा
मालवण : येथील सिंधू रत्न कलामंचच्यावतीने १८ डिसेंबरला सायंकाळी सहाला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ‘खुली जोडी नृत्य स्पर्धा २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार रुपये व करंडक, ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी विकी जाधव, संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.