पावस-सैतवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-सैतवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
पावस-सैतवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

पावस-सैतवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

sakal_logo
By

सैतवडे पंचक्रोशीतील
विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

सैतवडे ते खंडाळा खास एसटी सुरू
पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या गावात असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये परिसरातील गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाटपीट करावी लागत होती. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना घरी जाण्यात अडचणी येत होत्या. त्यांच्यासाठी आता सैतवडे ते खंडाळा अशी खास नवीन एसटी सुरू करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांची पायपीट थांबली आहे.
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतचा साधारणतः पाच किमीचा प्रवास खासगी वाहनांनी करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे कायदेविषयक स्वयंसेवक अरुण मोर्ये यांच्या सहकार्याने व शाळेतील शिक्षकांच्या सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची ही पायपीट थांबली आहे. या विद्यार्थ्यांना संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ३.३०वाजता सैतवडे ते खंडाळा अशी खास नवीन फेरी करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे अरुण मोर्ये यांनी प्रयत्न केले. रत्नागिरी आगारातील श्रीमती प्रभुणे व खंडाळा येथील वाहतूक व्यवस्थापक चव्हाण यांनी चांगले सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही एसटीची नवी फेरी सुरू केले.